मोदलपाडा, ता.तळोदा | वार्ताहर nandurbar
उघड्यावर मांस विक्रीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (lcb) पोलिसांनी तळोदा येथे एकावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून ४ हजार २०० रुपये किंमतीचे मांस जप्त करण्यात आले आहे. ही करवाई आज दि.९ रोजी कसाईवाडा येथे करण्यात आली.
पो.नाईक विशाल नागरे यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविस्तर वृत्त असे की, युनूसखान इस्माईलखान कुरेशी हा तळोदा येथील कसाईवाडा येथे उघड्यावर जनावरांचे मांस विक्री करत होता. त्याच्याकडे मांस विक्रीचा परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे ४ हजार २०० रुपये किंमतीचे ३० किलो जनावरांचे मांस मिळुन आले. वजनकाटा सोबत १ किलो वजनाचे माप व १ धारदार लोखंडी सुरा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस नाईक विशाल नागरे यांच्या फिर्यादीवरून युनूसखान इस्माईलखान कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले मांस नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नष्ट करण्यात आले.