Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशआनंद महिंद्रांची वैद्यकीय क्षेत्रात उडी?; सीईओ गुरुनानींना म्हणाले...

आनंद महिंद्रांची वैद्यकीय क्षेत्रात उडी?; सीईओ गुरुनानींना म्हणाले…

मुंबई | Mumbai

रशिया आणि युक्रेनचे गेल्या आठ दिवसांपासून युद्ध (Russia-Ukraine War) सुरु आहे. यामुळे युक्रेनमध्ये शिक्षण (Education) घेणाऱ्या हजारो भारतीयांना मायदेशी परतावे लागत आहे…

- Advertisement -

परदेशी शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात असे शिक्षण मिळत नाही का? असा प्रश्न सोशल मिडियावर सध्या उपस्थित केला जात आहे. याबाबत आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पुढाकार घेतला आहे.

OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक

त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical College) कमतरता आहे ही माहिती मला नव्हती. आपण महिंद्रा विद्यापीठात (Mahindra University) वैद्यकीय शिक्षणासाठी संस्था स्थापन करण्याचा विचार करू शकतो का? असे त्यांनी टेक महिंद्राचे सीईओ सी. पी. गुरुनानी (C. P. Gurunani) यांना टॅग करत विचारले आहे.

Russia-Ukraine War : मोदींचा फोन अन् रशियाकडून सहा तास युद्धविराम

त्यामुळे लवकरच भारतात परवडणाऱ्या पैशात वैद्यकीय शिक्षण मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या