Tuesday, May 21, 2024
Homeक्राईमउसनवारीचे पैसे मागीतल्यावरुन भडगावात वृध्दाचा खून

उसनवारीचे पैसे मागीतल्यावरुन भडगावात वृध्दाचा खून

भडगाव -Bhadgaon
उसनवारी दिलेले एक लाख रू. परत मागणीच्या कारणावरून व काहीतरी जादूटोणा केल्याच्या संशयावरून भडगाव पेठ येथील ७८ वर्षीय वृद्धांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे घटना घडली आहे.

याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला मयत सूपडू नाना पाटील वय ७८ वृद्धाच्या मुलाने एका २४ वर्षीय आरोपी विरूद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. हि घटना वरखेड ता.भडगाव येथील खदानी जवळ दि.८ रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने भडगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या