देवळाली कॅम्प | वाताॅहर
लॅमरोड बालगृह रोड वरील गंगासागर किराणा दुकानासमोरील अनुराधा स्टेट बँक काॅलनीत सायंकाळच्या सुमारास नाराळाच्या झाडवर फटाका-राॅकेट पडल्याने झाडाने पेट घेतला, झाड उंच असल्याने आगीच्या ठिणग्याग्या खाली पडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच कॅन्टाेन्मेन्ट बोर्डाच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधुन माहिती दिली.
- Advertisement -
त्यातच बालगृह रस्त्याचे काॅक्रीटिकरण चालू असल्याने अग्निशमन दलाचे वाहन येण्यास अडचण झाली तर महावितरण कंपनीचे कर्मचारी तात्काळ हजर होऊन जवळील वीजप्रवाह बंद केला तर अग्निशमन दलाचे वाहानचालक जयवंत गोडसे शुभम नेहे जयदीप निसाळ आदित्य निसाळ या जवानांनी आग आटोक्यात आणली.
स्थानिक नागरिक प्रकाश जाधव दशरथ जाधव किरण सायखेडे विनोद महाजन गणेश जाधव महेश जाधव संकेत निकम नितीन मांलुजकर आदींसह नागरिकांनी सहकार्य केले




