Friday, May 16, 2025
Homeधुळे...आणि 24 तासातच पोलिसांनी केला कल्पतरू सोसायटीतील घरफोडीचा उलगडा

…आणि 24 तासातच पोलिसांनी केला कल्पतरू सोसायटीतील घरफोडीचा उलगडा

धुळे Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

येथील शहरातील कल्पतरू सोसायटीतील (Kalpataru society) घरफोडीचा (Burglary) 24 तासाच्या आतच उकल (resolve) करण्यास चाळीसगाव रोड पोलिसांना (Chalisgaon Road Police) यश आले. पोलिसांनी चोरट्याला अटक (thief arrested) केली असून त्याच्याकडून दुचाकीसह 60 हजारांचा मुद्येमाल जप्त (Seizure of valuables) केला आहे.

श्री नटेश्वर व रंगभूमी पूजनाने बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

शहरातील आग्रा रोडवरील हॉटेल शेरेपंजाब जवळ राहणारे शंकरलाल अग्रवाल यांच्या कल्पतरू सोसायटीतील जुन्या घरी काल पहाटे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. घरातून रोख दोन हजाराची इलेक्ट्री शेगडी, मिक्सर असा एकुण 10 हजारांचा मुद्येमाल लंपास केला. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्या नोंद करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असतांना चाळीसगावरोड चौफुली येथे एक व्यक्ती हातात काहीतरी वस्तू लपवून फिरत असल्याची गुप्त माहिती सपोनि संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना त्या ठिकाणी पाठविले असता एक व्यक्ती संशयितरित्या हातात मिक्सर घेवून फिरताना दिसला. त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव इर्शाद खान असे सांगितले.

चौकशीत त्याने कल्पतरु सोसायटीतील घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून इलेक्ट्रीक शेगडी, मिक्सर, दोन हजार रूपयांची रोकड, पन्नास रूपये किंमीतची लोखंडी टॉमी व गुन्ह्यात वापरलेली 50 हजाराची दुचाकी असा एकूण 60 हजार 50 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावलमध्ये एकाची गळफास घेवून आत्महत्या

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, पोसई नासिर पठाण, पोसई. विनोद पवार, पोसई ज्ञानदेव काळे, असई दीपक पाटील, पोहकॉ पंकज चव्हाण, संदीप पाटील, पोना बी.आय. पाटील, पोकॉ चेतन झोळेकर, स्वप्निल सोनवणे, इंद्रजित वैराट, शरद जाधव, चालक कुलदिप महाजन, पोकॉ विशाल मोहीने यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...