Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रAndekar Murder Case : आंदेकर खून प्रकरणात आरोपींची बेकायदेशीर घरे पाडणार!

Andekar Murder Case : आंदेकर खून प्रकरणात आरोपींची बेकायदेशीर घरे पाडणार!

पुणे | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 18 आरोपींना अटक केलेली आहे. या खूनाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याचा चिन्हे आहेत.

- Advertisement -

त्यामुळे पुणे पोलीस आक्रमक झाले असून गुन्हेगारांनी आत्ताच त्यांच्या वागणुकीत सुधारणा केली नाही, तर ज्या गुन्हेगारांचे आणि आरोपींचे घर अवैधरीत्या बनवण्यात आले आहे किंवा जबरदस्तीने एखाद्याच्या जमिनीवर कब्जा करून घर बनवले असेल. अशा अनधिकृत घरांवर पुणे महानगरपालिकेच्या मदतीने पाडापाडीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

हे ही वाचा : संतापजनक! दिवसाढवळ्या फूटपाथवर महिलेवर अत्याचार होत होता अन् लोक…

पोलीस आयुक्त म्हणाले, कोणत्याही गुन्हेगाराने पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. वनराज आंदेकर खून प्रकरणात ज्या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे, त्यांच्या घरांची पोलीस झडती घेण्यात आलेली आहे. आरोपींनी एक वर्षापूर्वीच सहा ते सात पिस्तूल मध्यप्रदेश येथून बेकायदेशीररीत्या आणले होते.

आंबेगाव पठार याठिकाणी प्रामुख्याने सोमनाथ गायकवाड या आरोपीच्या टोळीतील सदस्य राहतात. त्यांच्या घर झडतीत गुन्ह्यातील पिस्तूल मिळालेली नाही. त्यामुळे आरोपींशी निगडित जे नातेवाईक किंवा जवळचे लोक आहेत, त्यांच्यादेखील घरांची झडती घेतली जाणार आहे.

हे ही वाचा : देव झालो, असे स्वत: म्हणू नये; मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?

वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तूल आणण्यासाठी कोणी आर्थिक मदत केली, याबाबतदेखील सखोल तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी तीन ते चार आरोपींची नावे निष्पन्न होऊ शकतात, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तविली.

येरवडा कारागृहात असलेल्या गुन्हेगार सुरज ठोंबरे याच्या सहभागाबाबतदेखील तपासणी करण्यात येत आहे. मागील दीड महिन्यापासून आंदेकरच्या खुनाची तयारी करण्यात येत होती. आरोपींनी पैसे गोळा करण्यासाठी कोणावर जबरदस्ती केली आहे का, याबाबतदेखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

हे ही वाचा : संगमनेर पोलीस उपविभागात ६२ जणांना प्रवेश बंदी!

बुधवारी रात्री आंबेगाव पठार परिसरात कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये वेगवेगळय़ा आरोपींच्या घराची तपासणी करण्यात आली आहे. टोळीतील जे आरोपी मोक्का तसेच इतर गुन्हय़ातून बाहेर आलेले आहेत. त्यांच्यावरदेखील नजर ठेवण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या