Tuesday, November 19, 2024
HomeUncategorizedअंगणवाडीतील मुलांना मिळणार 'व्हेज पुलाव'!

अंगणवाडीतील मुलांना मिळणार ‘व्हेज पुलाव’!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

लहान मुलांमधील कुपोषण रोखण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून शून्य ते ६ वयोगटातील मुलांना सकस आहार दिला जातो. मुलांच्या आहारात आणखी काही सकस पदार्थांचा समावेश करण्यात येणार असून यात नाचणीच्या लाडूसह व्हेज पुलाव (शेंगदाणा व भाजीपाला) देण्याचा प्रस्ताव महिला विकास बाल कल्याण विभागाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. 

- Advertisement -

सकस आहार दिल्यास मुलांची वाढ झपाट्याने होते. पौष्टिक आहाराचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे मुलाचे शिकणे, लक्षात ठेवणे, लक्ष देण्याची क्षमता आणि वागणूक वाढण्यास मदत होते. संपूर्ण आणि निरोगी आहारामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूचे पोषण करतात आणि तणाव किंवा चिंतापासून संरक्षण करतात. अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या सकस आहारामुळे कुपोषणावर हळूहळू मात करण्यात यश मिळत आहे.

सकस आहरात आतापर्यंत नाश्त्यासाठी लाडू, गूळ- शेंगदाणा चिक्की आदीचा समावेश होता. आता यामध्ये वाढ करून राजगिरा चिक्की, नाचणीचे लाडू देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तर दुपारच्या जेवणात वरण- भात, डाळ, तांदळाची खिचडी, मटकीची उसळ, गव्हाची लापशी आदी पदार्थाचा समावेश असणार आहे. यात वाढ करून व्हेज पुलाव (शेंगदाणा व भाजीपाला) व उपमा (शेंगदाणा व हिरवा वाटाणा आवश्यक) आदी दोन पदार्थ वाढवून देण्याचा प्रस्ताव महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने तयार करण्यात आला आहे.

लवकरच अंमलबजावणी
मुलांना दिल्या जाणाऱ्या सकस आहारात नाश्ता आणि दुपारच्या जेवणात नाचणीचे लाडू उपमा, व्हेज पुलाव व राजगिरा चिक्कीचा समावेश करण्यात आला आहे. या पदार्थांना शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सर्वच अंगणवाड्यांतील बालकांना सकस आहारातील वाढीव पदार्थ उपलब्ध करून देण्यात येतील, अशीही माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या