Sunday, September 8, 2024
Homeराजकीयठाकरे पिता-पुत्रांसह अजित पवारांना खोट्या प्रकरणांत अडकवण्यासाठी फडणवीसांचा दबाव; अनिल देशमुखांचे गंभीर...

ठाकरे पिता-पुत्रांसह अजित पवारांना खोट्या प्रकरणांत अडकवण्यासाठी फडणवीसांचा दबाव; अनिल देशमुखांचे गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi) असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) माझ्यावर दबाव आणला होता, असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांनी केला आहे. मी खोटे आरोप करण्यास, प्रतिज्ञापत्र करुन देण्यास नकार दिला. त्यामुळेच माझ्याविरोधात ईडी, सीबीआयकडून कारवाई करण्यात आली. मला तुरुंगात टाकण्यात आले, असा सनसनाटी आरोप देशमुखांनी केले आहेत. तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनीही देशमुख यांनी केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : संपादकीय : २४ जुलै २०२४ – जीवघेणा हव्यास

यावेळी अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले की, अजित पवारांनी (Ajit Pawar) पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटका व्यवसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्या, अशी मागणी केल्याचे वक्तव्य तपास यंत्रणांकडे द्या, असे सांगण्यासाठी काही लोकांकडून सातत्याने माझ्यावर दबाव टाकला जात होता. तसेच, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठीही माझ्यावर दबाव होता. मी जर तपास यंत्रणांपुढे चौकशीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि पार्थ पवार यांची नावे विविध खोट्या प्रकरणांत घेतली तर ईडीच्या प्रकरणात सोडून देऊ, अशी थेट ऑफरच देण्यात आली होती, असे देशमुखांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला कडक शब्दात दिला ‘हा’ इशारा

मविआच्या प्रमुख नेत्यांवर फडणवीसांनी कोणते आरोप करण्यास सांगितले होते, याची माहितीदेखील देशमुखांनी दिली.ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीसाठी मला पैसे जमवण्यास सांगितले असा आरोप उद्धव ठाकरेंवर करा. आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला बाल्कनीतून ढकलले असा आरोप करा. अजित पवारांवर गुटख्याच्या बाबतीत खोटे आरोप करा. अनिल परबांवर खोटे आरोप करा, असे सांगण्यात आले. त्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला, असे देशमुख म्हणाले.

हे देखील वाचा : प्रवासी विमान कोसळून भीषण दुर्घटना, विमानात १९ प्रवाशी असल्याची माहिती

तसेच मी दबावाला बळी पडलो नाही. खोटे आरोप करण्यास, प्रतिज्ञापत्र देण्यास मी स्पष्ट नकार दिला. त्यामुळेच माझ्यामागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावण्यात आला. खोट्या प्रकरणात मला अटक करण्यात आली, तुरुंगात टाकण्यात आले, असा गंभीर आरोप देशमुखांनी फडणवीसांवर केला.तर फडणवीसांच्या माणसाने मला दिलेला लिफाफा माझ्याकडे आहे. याबद्दलचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी पुराव्यांशिवाय बोलत नाही. योग्यवेळी पुरावे समोर आणेन. फडणवीसांनी पाठवलेल्या त्या व्यक्तीचे नावही जाहीर करेल, असे देशमुखांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या