Thursday, January 8, 2026
Homeराजकीयअनिल देशमुख पीएच्या माध्यमांतून पैसे घेत होते; सचिन वाझेंचे खळबळजनक आरोप

अनिल देशमुख पीएच्या माध्यमांतून पैसे घेत होते; सचिन वाझेंचे खळबळजनक आरोप

मुंबई । Mumbai

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यामधील मागील काही दिवसात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामध्ये आता मुंबईचे निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनी कथित १०० कोटी वसुली प्रकरणात पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. ज्याचे पुरावे हे सीबीआयकडे आहेत, असा दावा वाझेंकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यात राजकारणात खळबळ उडाली आहे. तर वाझेंने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र लिहिले असून या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil)यांचेही नाव असल्याचे वाझेकडून सांगण्यात आले आहे.

YouTube video player

हे ही वाचा : छंदावरून राजकीय वातावरण धुंद! थोरात व विखे यांची एकमेकांविरोधात जोरदार टोलेबाजी

सचिन वाझे म्हणाले, सगळे पुरावे आहे. सीबीआयकडे (CBI) देखील त्याचे पुरावे आहेत. पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. मी सगळे पुरावे दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव लिहले आहे.

सचिन वाझेंना मुंबईच्या पोलीस विभागातून बडतर्फ करण्यात आलेले आहे. त्यानंतर कथित १०० कोटींचे खंडणी प्रकरण, २०२१ च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात सचिन वाझे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहे. अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचे याआधी सचिन वाझे याने तपासादरम्यान सांगितले होते.

हे ही वाचा : पवारांचा नाद करू नका; खा. लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

पण आता त्यांनी थेट अनिल देशमुखांच्या आदेशानुसार पीएकडे पैसे दिले जात होते, असा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान कथित १०० कोटी वसुली प्रकरणात सध्या जामीनावर बाहेर असलेल्या अनिल देशमुखांची त्यांचा जामीन रद्द करून पुन्हा चौकशी करावी अशी मागणी भाजपाच्या प्रसाद लाड यांनी केली आहे.

ताज्या बातम्या