Wednesday, April 30, 2025
Homeनगरप्रत्येक जिल्ह्यात आता नोंदणीकृत पशुकल्याण समिती

प्रत्येक जिल्ह्यात आता नोंदणीकृत पशुकल्याण समिती

पशूआरोग्यासह पायाभूत सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात येणार्‍या सुविधांचा प्रभावी वापर करणे, पशूआरोग्य सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि पशूधनातील उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न कण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पातळीवर पशुकल्याण समित गठीत करण्यात येणार आहे. ही समिती जनावरांना आरोग्य सुविधांसह पशूंच्या सेवा-सुविधामध्ये सुधारणा करणार आहे. विशेष म्हणजे ही समिती नोंदणीकृत राहणार असून संबंधीत समितीची नोंदणी सोयायटी नोंदणी अधिनियम 1980, अतंर्गत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

- Advertisement -

याबाबतचे आदेश कृषी, पशूसंवर्धन, दुग्धविकास विभागाने सोमवारी (दि.29) रोजी काढले आहेत. जिल्हास्तरावर तयार करण्यात येणार्‍या पशूकल्याण समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपायुक्त पशूसंवर्धन, जिल्हा पशूधनविकास अधिकारी, सहायक आयुक्त पशूसंवर्धन, जिल्हा पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय, जिल्ह्यातील शासकीय पशुवैद्यकीय संस्थांचे कार्यालय प्रमुख, लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील पूशसंवर्धन विषयक सेवाभावी संस्था, पशूपालक, पशूसंवर्धन विषयक उद्योजक, सामन्य उद्योजक, दानशूर पशूप्रेमी यांचा समावेश राहणार आहे. ही नोंदणी सोयायटी नोंदणी अधिनियम 1980, अतंर्गत करण्यात येणार आहे.

या समितीचे दैनदिन कामकाज चालवण्यासाठी समितीमधील सदस्यांमधून मंडळ गठीत करण्यात येणार आहे. या मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार आहेत. पशूआरोग्य सेवा सुधारणा, पशूसंवर्धन विभाग व इतर संस्थामार्फत देण्यात येणार्‍या पशूआरोग्य सुविधांचा दर्जा व आधुनिकीकरण, सेवा शुल्क, देणग्या व इतर माध्यमांद्वारे संसाधने निर्माण करून त्याचा पशू आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी वापर करणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, पशूवैद्यकीय रुग्णालय सुस्थितीत ठेवण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या विविध निर्णय प्रक्रियेत शेतकरी व पशूपालकांना सहभागी करून घेणे हे समितीचे उद्देश राहणार आहेत.

ही आहेत समितीची कामे
पशूपालकांच्या समस्या सोडवणे, पशूचिकित्सालयाच्या दैनदिन व्यवस्थापनासाठी श्वास्त आणि पर्यावरणपूरक उपायोजनांचा अवलंब करणे, अन्य शासकीय विभागाच्या संपर्कात राहुन पशूसंवर्धन विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणे, रेबीज व अन्य प्राणीसंसर्गाबाबत जनमाणसात प्रचार करणे, पशूव्यवस्थापनात सुधारणा करणे, देणग्या व वापरकर्ता शुल्क आदीद्वारे संसाधणे तयार करणे, केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवणे, पशुवैद्यकीय रुग्णालय चालवण्यासाठी आवश्यक उपकरणे, औषधांचा पुरवठा करून आरोग्य सेवांचा दर्जा वाढवणे यासह अन्य कामे ही समिती करणार आहे.

हे कार्यकारी मंडळ काम पाहणार
जिल्हास्तरावर स्थापन करण्यात येणार्‍या समितीचे दररोजचे काम करण्यासाठी कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहणार आहेत. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सहअध्यक्ष राहणार असून जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी, सहायक आयुक्त पशूसंवर्धन, जिल्हा पशूवैद्यकीय सर्व चिकित्सालय, पशूपालकांचे दोन प्रतिनिधी हे मंडळाचे सदस्य राहणार असून जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त हे सदस्य सचिव राहणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : परप्रांतीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील एका बायपास रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत एका अल्पवयीन मुलीसोबत (वय 13) एका व्यक्तीने अश्लिल चाळे केल्याची घटना सोमवारी (28 एप्रिल) दुपारी...