Sunday, August 23, 2026
Homeक्राईमCrime News : परप्रांतीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे

Crime News : परप्रांतीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील एका बायपास रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत एका अल्पवयीन मुलीसोबत (वय 13) एका व्यक्तीने अश्लिल चाळे केल्याची घटना सोमवारी (28 एप्रिल) दुपारी दोन ते 2:30 वाजताच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

तारकेश्वर सियाराम शहा (पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी या मुळच्या उत्तरप्रदेश राज्यातील रहिवाशी असून त्या सध्या कुटुंबासह अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहतात. तारकेश्वर शहा याने सोमवारी दुपारी दोन ते 2:30 च्या सुमारास फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला (वय 13) दुचाकीवरून बायपास रस्त्यालगत मोकळ्या जागेत नेले आणि तिच्या अंगाशी लगट करत तिची छेड काढली.

या प्रकारामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली. घडलेला प्रकार फिर्यादीला समजल्यानंतर त्यांनी पीडितेसह एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेतला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.

ताज्या बातम्या

राज-का-रण : कागदावरील स्मार्ट सादरीकरण अन् रस्त्यावर २५ फुट खड्डा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिंहस्थाच्या ध्वजारोहणासाठी आता अवघे दोन महिने उरलेले असताना कुंभमेळा आयुक्तांनी, काळजी नको, सगळं काही ठीक होईल,...