Saturday, November 23, 2024
Homeक्राईमकत्तलीसाठी जाणारी 27 जनावरे पकडली

कत्तलीसाठी जाणारी 27 जनावरे पकडली

साडेसात लाखांचा मुद्देमाल ताब्यात || कोतवाली पोलिसांची कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

झेंडीगेट येथे कत्तलीसाठी चालविलेल्या लहान – मोठ्या 27 जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली. एक लाख 25 हजारांची जनावरे व सहा लाखांची दोन वाहने असा सात लाख 25 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शिवाजी मोरे यांनी फिर्याद दिली आहे. इम्रान मोहम्मद शफी शेख (वय 31 रा. साजीनगर, मुकुंदनगर), मोहसिन मुसा शेख (वय 29 रा. कोठला) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

रविवारी (23 जून) सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान चांदणी चौकाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. रविवारी सकाळी 6:20 वाजता कोतवाली पोलिसांकडील डायल 112 एमडीटी मशीनवर कॉल आला की, कायनेटीक चौक येथून गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तलीकरिता टेम्पोव्दारे झेंडीगेट येथे वाहतूक केली जात आहे. सदर कॉलनंतर पोलीस अंमलदार मोरे यांच्यासह अंमलदार पालवे, मिसाळ, सागर पालवे यांनी चांदणी चौकात झेंडीगेटकडे जाणार्‍या रस्त्यावर सैनिक लॉनसमोर सापळा लावला.

एक बोलेरो (एमएच 23 एयु 4271) संशयित वाहन पोलिसांनी थांबवून त्याची पाहणी केली असता त्यात एक जनावर मिळून आले. वाहनावरील चालक इम्रान मोहम्मद शफी शेख याने ते झेंडीगेट येथे कत्तलीसाठी चालविले असल्याचे सांगितले. त्याच दरम्यान 20 मिनिटाने आणखी एक संशयित पिकअप वाहन आले. पोलिसांनी ते थांबविले असता त्यात 25 लहान जनावरे व एक मोठे जनावर मिळून आले. या वाहनाचा चालक मोहसीन मुसा शेख याने झेंडीगेट येथे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची कबुली दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या