Tuesday, May 20, 2025
Homeमुख्य बातम्यातेव्हा छातीत कळ यायची, मग आता ठणठणीत?; भुजबळांच्या मंत्रिपदावरुन दमानियांची पोस्ट चर्चेत

तेव्हा छातीत कळ यायची, मग आता ठणठणीत?; भुजबळांच्या मंत्रिपदावरुन दमानियांची पोस्ट चर्चेत

मुंबई । Mumbai

- Advertisement -

मुंबई | राज्यातील महायुती सरकारमध्ये आज छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सकाळी 10 वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. साडेचार महिन्यांपूर्वी जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता, तेव्हा भुजबळ यांचे नाव अंतिम यादीतून वगळण्यात आले होते. मात्र आता, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंध आल्याने राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे असलेली खाती आता छगन भुजबळ यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.दरम्यान, भुजबळ यांच्या शपथविधीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर थेट निशाणा साधत म्हटले की, “वाह फडणवीस वाह! एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री. जनता अशीच भरडली जाणार का?” दमानिया पुढे म्हणाल्या, “हा संदेश आहे का माझ्यासारख्या भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्यांना, की तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे, की सभ्य, प्रामाणिक माणसेच मिळत नाहीत राजकारणात?”

https://x.com/anjali_damania/status/1924631926352314394

त्यांनी भुजबळांच्या पूर्वीच्या कारावासाचा संदर्भ देत म्हटले, “जेव्हा भुजबळ जेलमध्ये होते, तेव्हा त्यांचे एका बिचाऱ्यासारखे फोटो माध्यमांमध्ये झळकत असत. त्यावेळी छातीत कळ यायची. पण आता ते ठणठणीत झालेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची किळस वाटतेय.” दमानिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या घोषणांचा संदर्भ देत सरकारवर टीका केली. त्यांनी विचारले, “भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठे पावले उचलण्याचे जे वचन होते, तेच का हे पाऊल? ‘भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार’ या घोषणांचा काय अर्थ उरला?”

छगन भुजबळ हे एक अनुभवी नेते असून त्यांनी यापूर्वीही मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. मात्र त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप होत आले आहेत. काही काळ ते कारागृहातही होते. त्यांच्या पुनर्नियुक्तीवरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नैतिकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांच्या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, सरकारवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे सावट पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

एका

Chhagan Bhujbal: “आठ दिवसांपूर्वी केवळ एका ओळीचा संदेश…”; पडद्यामागे काय घडामोडी...

0
मुंबई | Mumbai राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि आमदार छगन भुजबळांचा महायुती मंत्रीमंडळात समावेश झाला आहे. त्यांनी काही वेळापूर्वी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली...