Saturday, March 29, 2025
HomeमनोरंजनVideo: अंकिता लोखंडेने वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, पार पाडलं मुलाचं कर्तव्य

Video: अंकिता लोखंडेने वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, पार पाडलं मुलाचं कर्तव्य

मुंबई | Mumbai

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेवर (Ankita Lokhande) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे वडील शशिकांत लोखंडे (Shashikant Lokhande) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनामुळे अंकिता प्रचंड कोसळली असून नुकताच तिच्या वडिलांच्या अंतिम दर्शनाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.

- Advertisement -

वडिलांच्या अंत्यसंस्कारवेळी अंकिता हमसून हमसून रडत होती. तिच्या कुटुंबियांनाही अश्रू अनावर झाले होते. अंकिताचा पती विकी जैन तिला सांभाळताना दिसला. अंकिता लोखंडेने वडील शशिकांत लोखंडे यांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्यानंतर तिच्या वडिलांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी रडणाऱ्या अंकिताला पती विकी जैन सावरताना दिसला. दरम्यान, अंकिताच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण सध्या समजू शकलेले नाही, मात्र ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते असं बोललं जातंय. अंकिताचे वडील व्यवसायाने बँकर होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पारनेरचे भूमीपूत्र IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner पारनेर (Parner) तालुक्याचे भूमीपूत्र असणारे आयपीएस सुधाकर पठारे (IPS Dr. Sudhakar Pathare) यांचे शनिवारी अपघाती निधन (Accident Death) झाले आहे. तेलंगणातील...