Friday, November 22, 2024
Homeनगरअण्णा हजारे यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ म्हणाले…

अण्णा हजारे यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ म्हणाले…

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा प्रकरणाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत याचिका दाखल केल्याचे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे या वृत्तानंतर माध्यमांत अनेक नेतेमंडळींनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, आता अण्णा हजारेंनीच या वृत्तावर आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. त्यांच्या खुलाशाने मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शिखर बँक प्रकरणाबाबत आण्णा हजारे याचे नाव आल्यावर शनिवारी (दि.15) दुपारी आण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना हा खुलासा केला. मी कधी बोलत नाही, बोललो नाही, मात्र माझे नाव आले. याचा मला धक्का बसला आहे. असे अण्णांनी म्हटले आहे. तसेच, 15 वर्षांपूर्वी मी आवाज उठवला होता. पण, आता या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही. अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीट संदर्भात ज्यांना माहिती आहे. ते बोलतील, माझा याच्याशी कुठलाही संबंध नाही, असे स्पष्ट शब्दात अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल केल्याचे वृत्त माध्यमांत आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांनाच लक्ष्य केले होते. मात्र, अण्णांनी क्लोजर रिपोर्ट याचिकांसदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी कुठलीही याचिका दाखल केली नसल्याचं अण्णांनी म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या