पुरुष – आपणास मध्यम मार्गी साडेसाती आहे. ही सूचना देणारी आहे. या मिळणार्या सूचनांचा आपण अनादर केल्यास पुढील काळ हा भोगायचा असतो. यासाठी आपण शक्यतोवर वाडवडिलांचे शब्द खाली पडू देवू नका. आपण या नवीन वर्षात धार्मिकतेकडे वेळोवेळी वळणार आहात व त्यासाठी खर्च पण करणार आहे. माता, पिता घरी आणि आपण जातो पंढरी तर यात कधीही ईश्वरी आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत. तर हे वर्ष प्रगतीचे, आनंदाचे असणार आहे. दोन पैसे हाती खेळणार पण आहे. नैसर्गिक आपत्तीचा फटकादेखील बसणार आहे.
महिला – या वर्षात आपण ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करणार आहेत. याविषयीच्या अडचणीच्या सूचना संकेत मिळून आपण कार्यात बदल करणार नाहीत. समजत असून उमजत नाही असला प्रकार महिलांच्याबाबतीत बघायला मिळणार आहे. घरात मंगलकार्य संपन्न होणार आहेत. या कार्यात नको ती नातेवाईक मंडळी यांचे आगमन होणार आहे. आपण शक्यतोवर यावर्षी सर्व कार्य हे कायद्याला धरुन करावे. आपण महत्त्वाची कामे स्वत:च्या मनाने करु नका, त्याबाबत घरातील वृद्ध जणांचा सल्ला घ्या. उसनवारीचे व्यवहार टाळावेत.
नोकरवर्ग – जी मंडळी रोजंदारीचे काम करीत असते. तृतीय कर्मचारी आहेत व आपली राशी कुंभ आहे तर आपणास हे वर्ष उत्तम, चांगले जाणार आहे. आपणास नवीन जागी नोकरी करावयाची असल्यास आपण प्रयत्न करा. नवीन नोकरीचा लाभ होईल सरकारी नोकरी इच्छुकांनी प्रयत्न करावेत. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जी मंडळी शिकून तयार आहेत आतापर्यंत आपणास नोकरी प्राप्त झालेली नाही. त्यांना या नवीन वर्षी नोकरीच्या संधी प्राप्त होतील. हे नवीन वर्ष आपणास खासगी क्षेत्रात नोकरी करीत आहेत. एखाद्या संस्थेत कार्य करीत आहात सरकारी नोकरीसह आर्थिक उन्नती होईल.
व्यवसाय – व्यापारी, व्यवसायिक आपली कुंभ राशी असेल तर आता आपण व्यवसायाबाबत चिंता सोडा. हे नवीन वर्ष आपणास जेवढा व्यापार करावयाचा असेल तेवढा व्यापार आपण करावा. व्यापारात बदल जरुर करावा. नवीन सुख-सोई निर्माण करा. आपले व्यवसायाला अद्ययावत असे रुप देण्याची गरज आहे. या नवीन वर्षी आपणास नवीन जागेत व्यवसाय करण्याच्या संधी प्राप्त होणार आहेत. व्यवसायनिमित्त वाहन खरेदीचे योग आहेत. मॉल संस्कृतीत व्यवसाय करण्याचे जिकरीचे आहे हे लक्षात घेवून आपण या नवीन वर्षात ग्राहकांना आकर्षित योजना सुरु करुन व्यवसाय करावा.
विद्यार्थीवर्ग – विद्यार्थी-विद्यार्थिनींना नवीन वर्षात अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे व या अभ्यास कार्यासाठी आपणास खूप मेहनतदेखील घ्यावी लागणार आहे. वकील कायदाविषयक शिक्षण घेणारे, कॉम्प्युटर इंजिनिअर, गणित शिक्षण मार्ग, सी.ए., बी.ई.इंजिनिअर, ऑटोमोबाईल इंजिनिअर, शास्त्रज्ञ संशोधक, टेलीकम्युनिकेशन हे शिक्षण घेणारे सर्वांना उत्तम शिक्षणाचा लाभ होवून आपले इच्छेनुसार आपणास यश मिळणार आहेत. कुंभ राशी विद्यार्थीवर्गास या नवीन वर्षात अतीउत्तम ग्रहाची साथ आहे. आता आपली पण अभ्यासाची साथ ग्रहांना द्यावयाची आहे.
राजकारणी – आपण कुंभ राशी व्यक्ती राजकारणी आहात व राजकारणात आपली तिसरी, चौथी टर्म आहे तर हे वर्ष आपणास राजकारणात यश मिळवून देणारे असणार आहे. परंतु आपले राजकारणातील जवळचे लोक आपले तिकीट कापण्याचा प्रयत्न करतील याबाबतीत आपण सावध असावे. आपले हायकमांडदेखील आपणापासून काही मोठा लाभ मिळावा याकडे अधिक लक्ष देणार आहे. नगरपालिका, ग्रामपंचायतस्तरावरील राजकारणी व्यक्तींमध्ये जी मंडळी दोनदा, तिसरे वेळी पराजीत झालेली आहेत, अशी मंडळींना यावर्षी विजयाची अधिक शक्यता आहे.
आरोग्य – कुंभ राशी व्यक्तीचे मोठे ऑपरेशन झालेले आहे व आपले आरोग्याविषयी डॉक्टरांना पण चिंता आहे परंतु आपणास ग्रहयोग अधिक जीवन आयुष्याचा लाभ करुन देणार आहेत. आपले अनारोग्याची स्थिती मात्र अधिक काळ असणार आहे. इतर कुंभ राशी व्यक्तींना त्यांच्या कर्मगतीनुसार आरोग्याचा लाभ अगर उत्तरोग्य हानी होणार आहे. इतर युवावर्गांचे आरोग्य पूर्ण वर्षभर उत्तम राहणार आहे. छंद, व्यसनाधीन असणार्यांनी आपले व्यसनांवर नियंत्रण ठेवावे अन्यथा आरोग्याची चिंता लागणार असून वेळप्रसंगी ऑपरेशनची पण येण्याचे योग आहेत.
नातीगोती – नातेसंबंधिताबाबत आपण आपले स्वभावाच्याविरुद्ध वागणार आहेत. याबाबत इतर जणांना आश्चर्यदेखील होणार आहेत. यावर्षी आपण नातेसंबंधाबाबत आपले सांसारिक सहकारी यांचे मताप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार आहात. याचा लाभ आपणास शत्रुत्व असलेले नातेवाईकांशी आपण सख्य करीत आहात ते घेणार आहेत. हे कळत असूनसुद्धा याबाबतीत आपले पायावर कुर्हाड पाडून घेणार आहात. रक्तसंबंधितांशी शत्रुत्व व पररक्ताशी जुळवणुकीची या नवीन वर्षातील घटना आपणास जीवन आयुष्यात चिंता लावणारी ठरणार आहे.
आर्थिक – नवीन वर्ष सर्वच कुंभ राशीला आर्थिकबाबतीत प्रगतीपर ठरणार आहे. यामुळे आपले हातात सतत पैसा खेळत राहणार आहे. याशिवाय सरकारी योजनांचा लाभपण आपण मिळविणार आहेत. यामुळे आपण नवीन काही योजना सुरु करणार आहात. परंतु नको त्या योजनांपासून काहीही लाभ होणार नाही. नको त्याठिकाणी, नको त्या माणसावर आपण खर्च कराल आपण डोळस असून आपले जवळपासचे माणसाबाबत आंधळे होणार आहेत याशिवाय कर्मगतीचे फल म्हणून नैसर्गिक आपत्तीची शक्यता आहे.