पुरुष – हे वर्ष समस्त मेष राशी पुरुषांना आपल्या सर्व कार्यास सफलता सिध्दी प्राप्त करून देणारे आहे. मागील वर्षात आपणास ज्या कार्यात अडचणी आल्यात, सफलता प्राप्त झालेली नसेल अशी सर्व कार्य ही सफलता मिळून देणारी असणार आहेत. कुटूंब, समाजात आपले स्थान बळकट होणार आहे. अचानक काही काळापुरते वादाचे प्रसंगाची पण संभावना आहे. मागील वर्षापेक्षा ह्या नवीन वर्षात अधिक आर्थिक लाभ होतील.
महिला – हे नवीन सर्व समस्त महिलांना अत्यंत सुखावह असणारे आहे. अविवाहीत असतील त्यांचे विवाह या वर्षी ठरतील. मुलींचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांना त्यांचे घरातून विवाह करणेस अडथळा होईल. वर्षाचे मध्यंतरानंतर टेस्ट ट्युब बेबी करणेस उत्तम काळ आहे. नौकरी करणारे महिलांना ह्या वर्षात बढतीचे योग आहेत व पगारवाढही केली जाईल. गर्भवतींनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. घरात माहेरची मंडळींची वर्दळ राहील. त्यांचे मार्फत आपले घरात मंगल कार्य देखील संपन्न होणार आहे.
नोकरवर्ग – स्त्री-पुरुष आपण नौकरी करीत असाल तर आपले कार्यावर वरीष्ठ अधिकारी वर्ग खुश राहणार आहेत. यामुळे आपणास इच्छित ठिकाणी बदलीचे योग आहेत व पगारवाढीचे ग्रहसंकेत आहेत. नोकरीची इच्छा आहे त्यांनी नौकरी बाबत प्रयत्न करावेत. अनेकांना सरकारी नौकरीच्या संधी प्राप्त होतील. मागील वर्षी परदेश गमनाच्या संधी प्राप्त झालेल्या नाहीत अशा नौकर वर्गास परदेश गमनाच्या संधी प्राप्त होतील. महिलांना नवीन वर्ष सर्व तर्हेने सुख समाधानाचे जाणार आहे.
व्यवसाय – मागील वर्ष अडचणीचा सामना करावा लागला. काही सौदे नुकसानी देवून गेले व त्यात दोन हजार रूपयांची समस्या उभी राहिली होती. असा हा मागील वर्षाचा काळ असतांना हे वर्ष मात्र समस्त व्यापारी वर्गास दिलासा देणारे आहे. मालाचे स्टॉक आपणास नफे मिळवून देणारे असणार आहे. या वर्षात व्यवसायात आर्थिक लाभ बर्यापैकी मिळणार आहे. कर्ज समस्या बर्याच प्रमाणात कमी होईल. कर्ज समस्या राहणार पण नाही. दीर्घकालीन आर्थिक बचत या वर्षात होणार आहे. उत्तम व्यवसाय चालेल.
विद्यार्थीवर्ग – समस्त विद्यार्थी विद्यार्थीनींना नवीन वर्षातील जस जसे दिवस पुढे सरकत जातील जस तसे यश अधिक मिळेल. पण ह्यासोबत अभ्यास पण करावा लागेल. शालेय प्रवेशाचे वेळी आपणास काही कायदेशीर अडचणी आल्या तरी त्याचे निकारण लवकर होणार आहे. वकिली कायद्याचा अभ्यास, ऑटो पार्ट, इंजि., मेकॅनिकल, टेलीकम्युनिकेशन, करसल्लागार, बीकॉम, एम.कॉम विद्यार्थी वर्गास हे वर्ष यश मिळविणारे आहे. सी.ए. विद्यार्थी वर्गास मात्र थोड्या मार्काने यश निसटण्याचे योग आहेत. अभ्यासात लक्ष द्यावे.
राजकारणी – प्रथम सहा महिन्याचा काळ हा जुन्या राजकारणी व्यक्तींना अति उत्तम काळ आहे.नंतरचा काळ हा नवीन युवा राजकारणी यांना यश मिळवून देणारा असेल. आपल्या मागे काही कायद्याच्या अडचणी असतील तर त्याचे निराकरण होईल. या वर्षात अपघात भयाची संभावना आहे. त्याचप्रमाणे आपलेच कार्यकर्ते आपणाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. कार्यकर्तेचे वादाच्या घटना अंगाशी येण्याची संभावना आहे. ह्याकडे लक्ष द्यावे.
आरोग्य – ह्या वर्षात आरोग्य हे नरम गरम राहणार आहे. ज्यांचे आरोग्य बाबत चिंता आहेत, ज्यांची ऑपरेशन झालेली आहेत त्यांचे आरोग्यात सुधारणा होईल. जड जोखमीची कामे स्वत: करू नये. लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. अग्निपासून धोका व डोक्यावर आघात होण्याची संभावना आहे. छंद फंद ह्यामुळे झालेले विकार चिंता ग्रस्त होण्याचे ग्रह संकेत आहेत. गळवे फोड फुन्सी तसेच मुलींना मुरुम पुटकळ्यांचा त्रास होईल. वृध्द मंडळींना दातांचा त्रास व डोळ्यांचे ऑपरेशनचे योग आहेत. डायबिटीज व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी.
नातीगोती – ह्या नवीन वर्षात नातेवाईकांची वर्दळ आपले घरात वाढणार आहे. मुला-मुलींचे अथवा आपले स्वत:चे विवाहामुळे नवीन नाते संबंध जुळणार आहे. जुने नातेवाईकांचे सहकार्यामुळे घरात विवाह जुळणार अहेत. घरात मंगल कार्य संपन्न होणार आहे. या वर्षात काही नातेवाईक मंडळी आपणाकडून आर्थिक सहाय्याची अपेक्षा करतील. आपली आर्थिक सहाय्य करणेची इच्छा नसतांना नातेवाईक मंडळींना आर्थिक सहाय्य करावे लागणार आहे. पत्नीचे नातेवाईक मंडळी सोबत बराचसा प्रवास आपणास ह्या वर्षात करावा लागेल.
आर्थिक – आर्थिक परिस्थिती मागील वर्षापेक्षा अति उत्तम असणार आहे. वर्षारंभीपासून वर्षाचे अखेर पावेतो आर्थिक आवक कार्य आपले प्रगती पथावर असणार आहे. नौकर वर्गाचे पगार वाढतील. व्यवसायांचे व्यापारात अधिक नफे मिळविले जातील. महिला वर्ग जो नौकरी आहेत किंवा लहान मोठे व्यवसाय करीत आहे. त्यांना ह्या वर्षात मागील वर्षापेक्षा अधिक आर्थिक लाभ मिळतील. भिसी आपली असेल तर आपली भीसी लागेल. आपणास माहेर मंडळीकडून पण सणवारनिमित्त रोख पैसे रुपात भेटी मिळतील. सोने-चांदीचे दागिने वस्त्र खरेदीचे योग आहे. दुरवर तिर्थाटन कुटूंबीया समवेत कराल.