Wednesday, May 22, 2024
HomeUncategorizedवार्षिक भविष्य २०२४ - तूळ : अविवाहितांचे विवाह ठरतील

वार्षिक भविष्य २०२४ – तूळ : अविवाहितांचे विवाह ठरतील

पुरुष – ज्या पुरुषांची तूळ राशी आहे अशा पुरुषांना येते नवीन वर्ष हे कौटुंबीक सुख-समाधानाचे असणार आहे. भरभरुन सुखाचा लाभ आपणास या वर्षात होणार आहे. आपण स्वत: अविवाहित असाल तर आपले ‘शुभमंगल सावधान’ होईल. आपण विवाहित असून आपली मुले-मुली विवाहेच्छुक असल्यास त्यांना पण योग्य स्थळे येणार आहेत. इच्छा असल्यास विवाह ठरतील. आपण भाड्याच्या घरात राहत आहात किंवा नवीन घर घेण्याची इच्छा असल्यास त्या इच्छा पूर्ण होतील. मुलांसाठी खरेदी कराल. शेतकरीवर्ग इच्छा असल्यास ट्रॅक्टर खरेदीचे योग प्रबळ आहेत.

महिला – ज्या महिलांची राशी तूळ आहे त्यांच्यासाठी उत्तम शुभग्रह संयोग या वर्षात होत आहे. संसार, कुटुंबस्थानात आपले महत्त्व वाढणार आहे. आपले स्वत:च्या स्थानात परिवर्तन होणार आहे. कुमारीकांचे विवाह होवून ‘सौभाग्यवती’ नावाने ओळखले जाल. संततीप्राप्तीचे योग असल्यामुळे आई होणार आहात. नातूचे आगमन होणार असल्याकारणांनी आपण आजी होणार आहात. कुटुंबियांसमवेत तिर्थाटनाचे योग आहेत. आपण विद्यार्थीवर्गासाठी काही काम करीत आहात तर शासनातर्फे आपणास योजनेचा लाभ मिळणार आहे. नोकरीची इच्छा असल्यास यावर्षी नोकरीच्या संधी प्राप्त होतील.

- Advertisement -

नोकरवर्ग – आपण पती-पत्नी मिळून नोकरी करीत असाल तर पत्नीस येते वर्षी अधिक लाभ मिळतील. त्या खालोखाल पतीला लाभ मिळतील. आपले कार्यालयामार्फत पारितोषिके, सन्मानीत होण्यासाठी नावे सूचविली असल्यास आपले नावाची निवड होईल. आपण नोकरी करीत आहात व या वर्तमान जागीचा पगार आपणास परवडत नाही व आपण दुसरीकडे नोकरीचा शोध घेत आहात तर आपला शोध या नवीन वर्षात पूर्ण केला जाईल. अधिक पगाराची नोकरी प्राप्त होईल. परंतु यासाठी आपणास दूरवर जावे लागणार आहे. ज्यांना नोकरीची इच्छा आहे, त्यांना नोकरीच्या इच्छा पूर्ण होतील.

व्यवसाय – ज्या व्यापार व्यवसाय यामध्ये स्टॉक करुन तेजी-मंदीचे खेळ करता येतात अशा समस्त व्यापारीवर्गाने आपले अनुभवानुसार स्टॉक मोठ्याप्रमाणावर करावेत. या स्टॉकबाबत या वर्षभरातील प्रथम सहा महिन्यात या मालाच्या स्टॉकबाबत निर्णय घ्यावेत. प्लॅस्टिक साहित्य उत्पादक, प्लॅस्टिक वस्तु, माल वाहन उद्योग, वाहन सर्व्हिसिंग उद्योग, मद्य व्यापारी, होटलचालक, गेस्ट हाऊस, मोठी हॉटेल्स, लेडिज सामान, लेडिज सौंदर्य प्रसाधने, ब्युटी पार्लर, प्लॅस्टिक सर्जन, कारपेंटर, बिल्डिंग पेंटर, कलाकार, कलावंत, टेलर, केशकर्तनालय या सर्वांना अतीउत्तम वर्ष असणार आहे.

विद्यार्थीवर्ग – हे नवीन समस्त विद्यार्थीवर्गास सर्वसामान्य असे जाणारे आहे. यासाठी समस्त विद्यार्थीवर्गास आपणास अधिकच अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. या वर्षातील प्रथम सहामाहीतील काळ हा सर्वसामान्य यश देणारा असणार आहे. यानंतरचा काळ हा अत्यंत कष्टकारक, अनारोग्यकारक व शालेयकार्यात समस्या उत्पादन करणारा असणार आहे. नवीन शाळेत प्रवेश घेत आहात तर यात अपूर्ण कागदपत्रे, कायद्याच्या अडचणी, पैश्यांच्या समस्या या उत्पन्न होणार आहेत. चुकीच्या मित्र समुहापासून आपण दूर रहावे.

राजकारणी – आपण राजकारणी छोटे असो अथवा मोठे राजकारणी आपणास येते नवीन वर्ष हे यश मिळवून देणारे असणार आहे. परंतु या नवीन वर्षी आपणास आपली तिजोरीची दारे उघडी ठेवावी लागणार आहे. आपल्या वागणुकीची शिकवण आपले कार्यकर्ते पण घेणार आहेत. यामुळे राजकारणातील हिस्सेदारी, सौदेबाजीपण आपले विश्वास समजणारी कार्यकर्ती मंडळी करणार आहेत. आता आपले राजकारण यावर्षी एकट्याचे असणार नाही. सरळ-सरळ सौदेबाजीचे राजकारण आपणास करावे लागणार आहे. आपली राजकारणातील भूमिका यावर्षी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आरोग्य – मानसिक समाधानाच्या या गोष्टी घडणाच्या असल्यामुळे शरीर स्वास्थ पण आपणास उत्तम लाभणार आहे. आपली ऑपरेशन झालेली असल्यास किंवा आपली अनारोग्यस्थिती असल्यास आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. मात्र मध्यंतराचे काळात प्रकृतिमानात अचानकपणे अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. पथ्यपाणी पाळावे लागेल. कुपथ्य करु नका. काही अतिरेकी कामाचा ताण पण आपणास पडणार आहे. याबाबत सावध असावे. आरोग्यलाभाचे हे वर्ष आहे. यामुळे आपण व्यसनापासून दूर रहावे. वृद्धजणांना जी आपल्या आरोग्याची काळजी होती ती दूर होणार आहे.

नातीगोती – मागीलकाळात नातेसंबधितात दुरावा जो निर्माण झालेला होता व नातेवाईकांशी बोलणे बंद झालेले होते. या नवीन वर्षात नातेसंबधितात असे प्रसंग निर्माण होणार आहेत की आपणास एकमेकांशी संवाद साधावाच लागणार आहे व यातूनच नातेसंबधातून विवाहकार्य जुळविले जाणार आहे. मंगल शुभमंगल कार्यदेखील संपन्न होणार आहेत. यामुळे नातेसंबधितात गोडवा निर्माण होणार आहे. विवाहीत मुलींनी सासू-सासरे यांच्याशी संबंध प्रेममय ठेवावे. यांच्यापासून आपणास आश्चर्यकारक, भाग्यकारक लाभ होणार आहे. नातेसंबधित मिळून यात्रा संपन्न कराल.

आर्थिक – कोरोना काळातील झालेले नुकसान व मागील वर्षातील आर्थिक समस्या या वर्षात असणार नाही. तूळ राशी समस्त व्यक्तींना नवीन आर्थीक वर्ष प्रगतीपर जाणार आहे. यामुळे आपले हातात दोन पैसे अधिक राहणार आहे. कर्ज समस्या असल्या तरी चुकते (निल) होतील. आपली उधारी, उसनवारी कुणाकडे अडकलेली असेल तर याबाबतीत प्रयत्न करा त्यात यश येईल. जुनी उधारी वसुलीने दिलासा मिळेल. स्त्रीया, महिला, मुली, सुनांसाठी सोन्या-चांदीचे दागिन्यांची खरेदी या वर्षात निश्चितपण होणार आहे. शेतकरीवर्ग शेती खरेदी करतील. भूमी, प्लॉट, फ्लॅट वास्तु खरेदीचे योग प्रबळ आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या