Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळे : जिल्ह्यात आणखी ८१ रुग्ण

धुळे : जिल्ह्यात आणखी ८१ रुग्ण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात दिवसभरात 81 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धोका वाढला आहे. दरम्यान, जिल्ह्याची आतापर्यंत बाधितांची संख्या 2152 झाली आहे.

- Advertisement -

आज दुपारी 4 वाजता दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील चार अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दोंडाईचा विमलनाथ नगर, शिंदखेडा नवी गल्ली, दोंडाईचा जुना भोईवाडा, आरावे येथील रुग्णांचा समावेश आहे.

शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 35 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात कुवे दोन, वाडी 18, वाडी बुद्रूक दोन, वारला एक, सावळदे तीन, होळनांथे दोन, राजपूतवाडा चार, पोलीस लाईन एक, गिधाडे एक, शिरपूर एक या रुग्णांचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील मोगलाई एक आणि साक्रीरोड एक येथील अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात खेडा एक, लामकानी चार, साक्रीरोड, भास्करनगर, विशाल इस्टेट प्रत्येकी एकाचा आणि विकास कॉलनी तीन रूग्णांचा समावेश आहे. खाजगी लॅब मधील धुळे शहरातील जमानागिरी रोड येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.

महापालिका पॉलिटेक्निट सीसीसी येथील भाईजी नगर येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

भाडणे साक्री सीसीसी येथील साक्री तोरवणे गल्ली, खुडाणे दत्त चौक, पिंपळनेर भाग्योदय कॉलनी, भाडणे प्रभाकर नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा तर कासारे खैरनार वाडा येथील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 20 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात साक्रीरोड तीन, जयशंकर कॉलनी, पवन नगर, देवपूर, शिरपूर, शिंदखेडा, गिता नगर, स्वामी नारायण कॉलनी, फागणे, पाळद प्रत्येकी एका रुग्णाचा तर नवभारत चौक ग.नं.6 येथील दोन आणि धुळे येथील सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2152 कोरोना बाधीत आढळून आले आहेत. दिवसागणिक रुग्ण आढळून येत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या