Thursday, May 15, 2025
Homeदेश विदेशजम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

पुलवामा | Pulwama

- Advertisement -

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग (Targeted Killing) ची घटना समोर आली आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

संजय शर्मा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या भागात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांनीही परिसराची नाकेबंदी केली आहे.

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ९ जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, संजय शर्मा हे बाजारात जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात संजय शर्मा जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, परिचारिकेच्या तक्रारीनंतर कारवाई

दहशतवाद्यांनी यापूर्वी शुक्रवारी रात्री देखील आसिफ अली यांच्यावर हल्ला केला होता. आसिफ अली नमाज अदा करून मशिदीतून परत येत होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना घेरले. बिजबिहारा भागातील हसनपोरा तवेला येथे दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, अनेक विद्यार्थ्यी जखमी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : लग्नाच्या फोटोने केला घात; मैत्रिणीकडून भावाकरवी मित्राचा खून

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मित्राने (Friend) लग्नाच्या वाढदिवसाचे (Birthday) फोटो व्हाट्स अॅप स्टेटसला अपलोड केल्याने संतापलेल्या मैत्रिणीने भावासह त्याच्या मित्रांकरवी मित्राचा घरात मारहाण (Beating)...