विखरण, ता.एरंडोल – वार्ताहर Erandol
कोणत्या माणसात कोणती कला राहील हे जेव्हा त्याच्या अंगी येते तेव्हा ती त्याच्या अंगी कला आहे हे सर्व लोकांना समजते असाच येथील इयत्ता पाचवीत जाणारा अंशुमन कैलास मोरे हा सध्या अहिराणी गाणे गाजवणारा गायक जगदीश नथू सदानंद शिव यांच्याबरोबर गायन करत असून युट्युबवर विखरण येथील हा मुलगा युट्युबवर खूपच धुमाकूळ घालत आहे.
अंशुमन हा विखरण येथील कैलास सुरेश मोरे व शारदा कैलास मोरे यांचा मुलगा असून आई वडील मोल मजुरी व केरसुनी विकून आपला उदरनिर्वाह भागवतात. अशा परिस्थितीही ते आपल्या मुलाला शिकवत असून त्याच्या अंगी असलेली गायनाची कला ही लोकांसमोर आणत आहेत. अहिराणी गाणे ‘तुना प्यार मा पागल वयना रे व राजा तू मना राजा रे’ या गाजलेल्या गाण्याच्या गायक जगदीश सदानंद शिव यांच्याबरोबर हा मुलगा सध्या युट्युबवर धुमाकूळ घालत असून ‘राणी ही जायना परत राजा देखस तुनी वाट’ या गाण्याने चांगला धुमाकूळ घातला असून त्याला पन्नास हजारावर लोकांनी लाईक केले असून एक मिलियन लोकांनी बघितले आहे.
अंशुमन याला त्याच्या आत्याचा मुलगा निलेश भालेराव याचे चांगले मार्गदर्शन असून त्यानेच अंशुमनला जगदीश सदानंद शिव यांच्याशी भेट घालून दिली. जगदीश सध्या युट्युब वर चांगलाच प्रसिद्धीस आला असून विखरण गावाचे नाव उज्वल करत असल्याच्या विखरणवासीयांना अभिमान आहे. अंशुमन विखरण येथील जिल्हा परिषदेच्या पाचवीच्या वर्गात शिकत असून त्याच्या या कलेच्या व युट्युब वर प्रसिद्धीस आल्याने शिक्षक वर्ग व विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन होत आहे.