Friday, May 24, 2024
HomeनाशिकNashik Crime News : दरोडा व शस्त्रविरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी; बेकायदेशीररित्या कोयता...

Nashik Crime News : दरोडा व शस्त्रविरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी; बेकायदेशीररित्या कोयता व चाकू बाळगणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक पोलीस आयुक्तालयातील (Nashik Police Commissionerate) दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने (Anti-robbery and Anti-Weapon Squads) धडाकेबाज कामगिरी करुन बेकायदेशीररित्या कोयता व चाकू घेऊन फिरणार्‍याला ताब्यात घेतले आहे. शहरातील पंचवटी परीसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

Nashik Crime News : ५० कोटींची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तरुणाला सात लाखांना गंडा

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवीण उर्फ बादल पवन वाघ (वय २३, रा. उदय कॉलनी, पोटींदे चाळ, क्रांतिनगर, मखमलाबादरोड, नाशिक) व अक्षय विरसिंग वाघेरे (वय २३, उदय कॉलनी, पोटींदे चाळ, क्रांतीनगर, मखमलाबादरोड, नाशिक) अशी त्यांची नावे आहेत. दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे अंमलदार प्रवीण गणेश चव्हाण यांना सोमवारी (दि.०९) याबाबत गुप्त माहिती मिळाली होती की, पंचवटी पोलीस स्टेशन (Panchvati Police Station) हद्दीत हद्दपार व रेकॉर्डवरील गुन्हेगार गोदापार्क, चिंचबनजवळ, पंचवटी परिसरात हातात धारदार कोयता व चाकू घेवून दहशत माजवत आहेत.

Nashik News : सुषमा अंधारेंच्या प्रतिमेला शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘जोडे मारो’; दिला ‘हा’ इशारा, पाहा Video

त्यानुसार पथकाने दोघांना १ धारदार कोयता व धारदार चाकूसह सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडील शस्त्र बंदी मनाई आदेश व हद्दपार आदेशाचे भंग केल्याने त्यांच्याविरूध्द पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे सपोनि किरण रोंदळे, अंमलदार विजयकुमार सूर्यवंशी, महेश खांडबहाले, प्रवीण चव्हाण, सागर बोधले, भरत राउत, तेजस मते, मनीषा कांबळे यांच्या पथकाने केली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबत मंत्री दादा भुसेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो व्हायरल; दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु

- Advertisment -

ताज्या बातम्या