Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात आजपासून सर्व प्रकारचे 'लिलाव बंद'

नाशिक जिल्ह्यात आजपासून सर्व प्रकारचे ‘लिलाव बंद’

नाशिक | प्रतिनिधी

दिवाळीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये कुठल्याही प्रकारची लिलाव प्रक्रिया पार पडणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, बाजारसमित्यांचे प्रशासकीय कामकाज पूर्णवेळ सुरु राहणार असून नागरिकांना प्रशासकीय कामाबाबत बाजारसमितीमध्ये येण्याची मुभा असणार आहे.

- Advertisement -

व्यापाऱ्यांकडे असलेले मनुष्यबळ दिवाळीनिमित्त आपापल्या गावी जात असल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळात लिलाव होऊ शकत नाहीत त्यामुळे व्यापाऱ्यांकडून सर्व प्रकारचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.

आज (दि १२) पुढील आठवड्यात (दि १९) पर्यंत सर्वच बाजार समित्यामध्ये लिलाव प्रक्रिया बंद असेल. तर, चांदवडसह इतर काही बाजार समित्या २२ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती बाजारसमितीकडून देण्यात आली आहे.

बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया बंद असली तरीदेखील परंपरेनुसार लक्ष्मीपूजन, पाडवा प्रशासकीय स्तरावर याठिकाणी पार पडतो त्यामुळे बहुतांश बाजार समित्यांना दिवाळीची सुट्टी नसून नियमितपणे प्रशासकीय कामकाज सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या