Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारअ‍ॅपेरिक्षा चोरट्यास 12 तासात अटक

अ‍ॅपेरिक्षा चोरट्यास 12 तासात अटक

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेली अ‍ॅपेरिक्षा (Apperiksha) व संशयित आरोपीस (thief) 12 तासाचे आत जेरबंद (arrested) करण्यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रमेश मगन कुवर रा. दरीपाड़ा पोस्ट आमरपाटा, ता. साक्री, जि. धुळे हे जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे उपचारासाठी आले असता त्यांनी त्यांच्या मालकीची 50 हजार रुपये किंमतीची अ‍ॅपेरिक्षा (क्र.जी.जे. 19-0293) ही जिल्हा रुग्णालयाचे गेट समोर पार्क करुन ठेवली होती.

सदरची पेरिक्षा ही दि.14 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या गेट समोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणुन 17 फेब्रुवारी रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी आले असता त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या आदेशान्वये नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या पेरिक्षाबाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली. तसेच चोरीस गेलेल्या अ‍ॅपेरिक्षाच्या शोधासाठी 2 पथके तयार केली.

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना एक इसम हा चोरीची रिक्षा नंदुरबार शहरालगत असलेल्या पातोंडा ते होळ रस्त्यालगत फिरत असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सांगीतल्याने त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना तात्काळ मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी रवाना करुन सदर इसमाचा शोध घेण्यास सांगीतले.

गुन्हे शोध पथकाने पातोंडा ते होळ रस्त्या दरम्यान सापळा रचला असता संशयीत आरोपी हा अ‍ॅपेरीक्षासह येत असतांना दिसुन आला. पोलीस पथकाने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता संशयीत आरोपी हा अ‍ॅपेरिक्षासह पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने विजय जयंता वळवी, , रा.खडकी, ता. अक्कलकुआ यास अटक केली. त्याच्याकडील अ‍ॅपेरिक्षा ही त्याने नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालयाचे गेट समोरुन चोरी केल्याची माहिती दिली. त्याच्याकडील 50 हजाराची अ‍ॅपेरिक्षा ( क्र.जी.जे.- 19-0293) ही कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केली.

सदरची कारवाई ही े पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांक्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोहेकॉ संदिप गोसावी, पोना नरेंद्र पाटील, पोना स्वप्निल पगारे, पो. शि. विजय नागोडे, पोशि युवराज राठोड, पोशि योगेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या