नाशिक | Nashik
राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) आतापर्यंत एकूण एक लाख ९८ हजार ८९९ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठी ५ हजार ७९७ मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी ही माहिती दिली.
हे देखील वाचा : Nashik News : पहिने धबधब्यावर तरुणांमध्ये ‘दे दणादण’; Video व्हायरल
ग्रामपंचायती, अंगणवाडी केंद्रे, समूह संघटक, सेतू सुविधा केंद्रे या एकत्रित माध्यमातून ५११५ मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून एक लाख ३० हजार ७२३ अर्ज प्राप्त झाले आहेत. नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात (Mahanagarpalika Area) ९८ मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून २९०६९ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर अंगणवाडी शहरी प्रकल्पांतर्गत ६८४ मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ३९१०७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
हे देखील वाचा : NashiK Crime News : ‘त्या’ खून प्रकरणातील सराईत आठवडा उलटूनही सापडेना
वैयक्तिक व शासकीय यंत्रणा बाहेरील व्यक्ती व्यतिरिक्त ही संख्या आहे. प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत (District Administration) देण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय यंत्रणा मेहनत घेताना दिसून येत असून, या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक लाभातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे.
हे देखील वाचा : “भुजबळ राजकारणातील फिरता रंगमंच, तर पवारसाहेब…”; संजय राऊतांचा निशाणा
दरम्यान, नोंदणी बाकी असलेल्या महिलांनी (Woman) जवळची अंगणवाडी केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये, वार्ड कार्यालये, सेतू सुविधा केंद्रे, आपले सरकार सेवा केंद्र येथील मदत केंद्रांशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनातर्फे दुसाणे यांनी आवाहन केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा