Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमहायुतीकडून विधानसभा समन्वयकांची नियुक्ती

महायुतीकडून विधानसभा समन्वयकांची नियुक्ती

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनाचा भाग म्हणून महायुतीने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत या समन्वयकांची यादी जाहीर केली. या यादीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रत्येकी एका पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.

भाजपच्या यादीत समन्वयक म्हणून अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा यांचा समावेश आहे. राणा हे युवा स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. लोकसभा निवडणुकीत राणा यांची पत्नी नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने लगेच त्यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी दिली होती. आता राणा यांचा समावेश भाजपने आपल्या समन्वयकांच्या यादीत केल्याने ते आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.

या निवडणुकीत विधानसभा समन्वयकांची भूमिका महत्वाची असणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बूथ स्तरापर्यंत प्रभावी नियोजन करत समन्वय साधण्याची जबाबदारी या समन्वयकांची असणार आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, भाजपने जिंतूरसाठी माजी आमदार रामप्रसाद कदम बोर्डीकर, कोपरी पाचपाखाडीसाठी आमदार निरंजन डावखरे, गोरेगावसाठी जयप्रकाश ठाकूर, मुंबादेवीसाठी माजी आमदार अतुल शहा, परळीसाठी माजी खासदार प्रीतम मुंडे, आष्टीसाठी माजी आमदार सुरेश धस, वाईसाठी माजी आमदार मदन भोसले यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या