Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रकर सहाय्यक, लिपिक-टंकलेखकांच्या नियुक्त्या पंधरा दिवसात होणार

कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखकांच्या नियुक्त्या पंधरा दिवसात होणार

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २०१९ मध्ये गट ‘क’ साठी घेण्यात आलेल्या कर सहाय्यक (Tax assistant) आणि लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना येत्या पंधरा दिवसात नियुक्ती देण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी विधानसभेत (Assembly) दिली…

- Advertisement -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘क’ मध्ये सन २०१९ मध्ये कर सहायक, लिपिक टंकलेखक आणि दुय्यम निरीक्षक या तीन पदांसाठी पदभरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या पदभरती विहित वेळेत केल्या जाव्यात तसेच या प्रक्रिया एका ठराविक कालबध्द वेळेत करण्यासंदर्भात विधानसभा सदस्य विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला.

या चर्चेत सदस्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar), नाना पटोले (Nana Patole), योगेश सागर (Yogesh Sagar) यांनी भाग घेतला. त्यावेळी बोलताना भरणे यांनी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ९ सप्टेंबर २०२० रोजी अंतरिम आदेशानुसार एसईबीसी आरक्षणासह स्थगिती दिली होती, अशी माहिती दिली.

कर सहाय्यकांची १२६ आणि लिपीक टंकलेखकाच्या १७९ पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसात नियुक्ती देण्याबाबत तसेच ३३ दुय्यम निरीक्षक मधील १७ जणांना नेमणूक आदेश दिले असून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सर्वांच्या वेळेत नेमणूका करण्यात येतील, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या