Saturday, September 21, 2024
Homeनगरअर्बन बँक चिल्लर घोटाळा; आरोपी लांडगेला वर्ग करणार

अर्बन बँक चिल्लर घोटाळा; आरोपी लांडगेला वर्ग करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर अर्बन बँक 3 कोटीच्या चिल्लर घोटाळ्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या आशुतोष लांडगे याला या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या आरोपीकडून माहिती घेण्यास सुरुवात केली असून, काही धागेदोरे सुद्धा त्यांच्याकडून हाती लागले आहेत. या गुन्ह्यातील माजी संचालकांना पकडण्यासाठी दोन पथके रवाना केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तीन कोटी रुपयांच्या चिल्लर घोटाळा प्रकरणामध्ये आशुतोष लांडगे या आरोपीचा समावेश आहे. सध्या तो 22 कोटी रुपयांचा घोटाळ्यामध्ये आरोपी असल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला नगरच्या या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

न्यायालयाने ती मान्य केली आहे. त्यामुळे आता त्याला या तीन कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींकडून सुरुवातीला माहिती मिळत नव्हती. आता त्यांच्याकडून काही माहिती हस्तगत झालेली आहे. तसेच काही कागदपत्र अद्यापपर्यंत मिळाले नसल्यामुळे, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुन्हा बँकेमध्ये जाऊन झाडाझडती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या