Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधवास्तू दोषामुळे आजारी आहात का ?

वास्तू दोषामुळे आजारी आहात का ?

तुमच्या घरातील वास्तू दोष देखील कुटुंबातील सदस्यांच्या खराब आरोग्यास कारणीभूत ठरू शकतो. एखादी व्यक्ती अधूनमधून आजारी पडणं आपण सामान्य मानतो. समस्या तेव्हा समोर येते ज्यावेळी एकदा आजार घरात शिरतो मात्र तो बाहेर पडण्याचं नाव घेत नाही. घरात अनेकदा असं होतं की, आजारपण एकदा घरात आलं की ते बाहेर जात नाही. यामध्ये कुटुंबातील सर्व लोक एकामागून एक आजारी पडतात. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक म्हणतात की, एखाद्या चांगल्या डॉक्टरला भेटावं, जो संपूर्ण तपासणी करून उपचार करू शकेल.

त्याचबरोबर वास्तुशास्त्रात नमूद केल्यानुसार, तुमच्या घरातील वास्तू दोष देखील कुटुंबातील सदस्यांच्या खराब आरोग्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे यावर वेळीच उपाय करायला हवा. जर तुमच्या कुटुंबातही अशा काही समस्या येत असेल तर आज त्यावर उपाय सांगत आहोत.

खांब किंवा मोठं झाड असल्यास काढून टाका –
जर तुमच्या घरासमोर खांब किंवा मोठे झाड असेल तर ते तुमच्या घरातील सकारात्मक उर्जेच्या प्रवाहात अडथळा बनतं. अशा परिस्थितीत, त्यांना वेळीच काढून टाकणं योग्य ठरेल. जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर त्या झाडांसमोर किंवा खांबांसमोर आरसा लावा. असं मानलं जातं की, यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात.

हॉलमध्ये हनुमानाचा फोटो लावा – वास्तुशास्त्रानुसार, भगवान हनुमान हे सर्व अडथळे दूर करणारे देवता मानले जातात. त्यांच्या शक्ती आणि तेजासमोर, नकारात्मक शक्ती निस्तेज होतात आणि घरातील कोणाचंही नुकसान करू शकत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आजारापासून वाचवण्यासाठी घराच्या मुख्य हॉलमध्ये हनुमानाचा फोटो लावा.

घराच्या मध्यभागी जास्त सामान नका ठेवू –
कोणत्याही घराचा मधील भाग उघडा असतो. अशावेळी अनेकजण या मोकळ्या जागेत जास्तीत जास्त सामान ठेवतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार, सकारात्मक ऊर्जा घराच्या मध्यभागी सर्वात कमी असते. अशा स्थितीत तिथे वस्तूंचा ढीग ठेवला तर ती ऊर्जा आणखी कमी होते. अशा परिस्थितीत जर आपण घराच्या मध्यभागी सामान ठेवले असेल तर ते ताबडतोब काढून टाका, जेणेकरून संपूर्ण घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह राहील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...