Friday, May 24, 2024
Homeनगरमावा तयार होणार्‍या शेडवर कोतवाली पोलिसांचा छापा

मावा तयार होणार्‍या शेडवर कोतवाली पोलिसांचा छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुगंधी तंबाखू (Aromatic Tobacco) व सुपारी बारीक करण्याची मशीन (Machine) कोतवाली पोलिसांनी जप्त (Kotwali Police Seized) केली आहे. शहरातील झेंडीगेट (Zendigate) परिसरातील सैदु कारंजा मस्जीद जवळ ही कारवाई करण्यात आली असून, एक लाख 38 हजार 600 किमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.

- Advertisement -

मशीनव्दारे सुगंधी तंबाखू (Aromatic Tobacco) व सुपारी बारीक करून मावा (Mava) तयार करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला सूचना दिल्या आहेत. फयाज इलियास शेख (वय 21, रा. कोठला झोपडपट्टी), सुफीयान नासीर शेख, (वय 20 रा. बडी मस्जीद जवळ, मुकुंदनगर) या दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या

झेंडीगेट (Zendigate) परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधीत तंबाखु व सुपारी बारीक करून प्रतिबंधित मावा विक्री केला जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना (Kotwali Police) गुप्तबातमीदारा मार्फत मिळाली होती. कोतवाली पोलिसांनी दोन पंचासोबात 20 जुलै 2023 रोजी सापळा लावून छापा (Raid) टाकला. या कारवाईत एक लाख 30 हजार रूपये किमतीची सुपारी फोडण्याचे लोखंडी मशीन, तीन हजार 600 रूपये किमतीची सुगंधी तंबाखुचे सिल्व्हर रंगाचे 18 पाकीट, पाच हजार रूपये किमतीचा इलेक्ट्रीक वजन काटा असा एक लाख 38 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.

निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे, शाहीद शेख, रवींद्र टकले, दीपक रोहकले, सुमित गवळी, प्रमोद लहारे यांनी ही कारवाई केली.

अंकुश चत्तर खून प्रकरण : तोफखाना पोलिसांकडून आणखी दोघांना अटकरात्रीच्या वेळी दारू पिऊन फिरणारे पाच जण पकडले

- Advertisment -

ताज्या बातम्या