धुळे । Dhule प्रतिनिधी
तीन महिन्यांचा पगार बंद (Pay off) का केला, या कारणावरून शिपायाने (Peon) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) कार्यकारी अभियंत्यांना (Executive Engineers) शिवीगाळ (abuse) करीत त्यांच्याशी अरेरावी केली. त्यांना जिवे मारण्याचीही धमकी (Death threats) दिली. याप्रकरणी शिपायावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता वर्षा महेश घुगरी (वय 53 रा. नागाई कॉलनी, देवपूर) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. काल दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या दालनात बजेटच्या कामाबाबत बैठक सुरू होती. तेव्हा विभागातील शिपाई सुधीर ईश्वर मगर (रा. भिमनगर, धुळे) हा कर्मचार्यांसमोर आला आणि तु मला पगार का देत नाही, असे बोलून घुगरी यांना अश्लिल शिवीगाळ केली.
तसेच शासकीय कामात अटकाव करीत तु कार्यालयाच्या बाहेर निघाल्यावर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. त्यानुसार गुन्हा नोंद झाला असून तपास उपनिरीक्षक शेवाळे हे करीत आहेत.