पुणे । Pune
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पुणे सत्र न्यायालयाने (Pune District Sessions Court) दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधातील अजामीन पात्र वॉरंट (Arrest Warrant) न्यायालयाने रद्द केले आहे.
मागील सुनावणीला गैरहजर राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते. मनोज जरांगे आज रुग्णवाहिकेतून न्यायालयात हजर झाले. प्रकृती बरी नसल्यामुळे मागील सुनावणीला हजर राहू शकलो नाही, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
हे हि वाचा : कल्याणमध्ये घाटकोपरची पुनरावृत्ती? महाकाय होर्डिंग कोसळले… अनेक वाहने दबली, थरारक VIDEO समोर
संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये जरांगे पाटील हे उपचार घेत असून डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड संबंधी आजार असल्याचं सांगितले आहे, त्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. या कारणास्तव न्यायालयाचा अटक वॉरंटचा आदेश रद्द करण्यात यावा अशी विनंती जरांगे पाटील यांच्या वकिलांनी केली.
दरम्यान मनोज जरांगे यांनी समाजमाध्यमांद्वारे न्यायालयाच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याची बाब फिर्यादीच्या वकिलांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी प्रत्येकाने टाळावी, त्यामुळे अवास्तव कारवाईस म्हणजे न्यायालयाच्या अवमान कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही अशा शब्दात न्यायाधीशांनी मनोज जरांगे पाटील यांना समज दिली.
हे हि वाचा : वेषांतरांच्या आरोपांवर अजितदादा भडकले; म्हणाले, तर मी राजकारण सोडेन…