नाशिक | Nashik
सध्या राज्यात लोकसभेनंतर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरले असून त्यांचे काही वेळापूर्वीच नाशकात आगमन झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik News : सिंहस्थ तयारीचा विभागनिहाय आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास वर्षा निवासस्थानाहून मुंबई विमानतळाकडे (Mumbai Airport) रवाना झाले होते. त्यानंतर पावणे दोन वाजेच्या सुमारास त्यांनी मुंबईहून ओझर विमानतळाकडे प्रयाण केले होते. यानंतर अडीच वाजेच्या सुमारास त्याचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांचे ओझर विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर ते पुढील बैठकीसाठी शहरातील हॉटेल एक्स्प्रेसइनकडे रवाना झाले असून काही वेळातच त्यांचे येथे आगमन होणार आहे.
हे देखील वाचा : Vegetables Rate : भाजीपाल्याची आवक घटली; दर वाढले
दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत २१ उमेदवार रिंगणात आहेत. यात खरी लढत ही अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) मह्विकास आघाडीचे संदीप गुळवे (Sandeep Gulve) आणि महायुतीचे किशोर दराडे (Kishor Darade) यांच्यात होण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा