Friday, September 20, 2024
HomeनाशिकVegetables Rate : भाजीपाल्याची आवक घटली; दर वाढले

Vegetables Rate : भाजीपाल्याची आवक घटली; दर वाढले

किचनचे बजेट कोलमडले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची (Vegetables) आवक घटल्यामुळे बाजारभावात वाढ झाली असून, या दरवाढीमुळे किचनचे बजेट कोलमडले आहे. टोमॅटो, वांगी, भेंडी, फ्लॉवर, दोडके, गिलके, सिमला मिरची आदींचे भाव शंभर रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.बटाट्याचे ( Potato) भाव ५० रुपये प्रतिकिलो तर कांद्याची ५० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ बाजारात विक्री सुरू आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik APMC) सद्यस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर इत्यादी भागातून पालेभाज्या व फळभाज्यांची आवक होत असते. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, अहमदाबाद गुजरातकडे पाठवला जातो.

काही प्रमाणात स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करतात. मात्र दर वधारले असून स्थानिक पातळीवर होणारी विक्री किंमत वाढली आहे. फळभाज्यांमध्ये (Fruits and Vegetables) सध्या काकडी, घेवडा, शिमला यांची हंगामानुसार आवक घटली आहे. मात्र दुधी भोपळा, कारली, दोडका, गिलके आदी फळभाज्यांची आवकही घटली आहे.

घाऊक बाजारात पालेभाज्या सर्वसाधारण भाव कोथिंबीर हायब्रीड ९३०० रु. शेकडा, मेथी ३८०० रुपये शेकडा, शेपू ४८०० रुपये शेकडा, कांदापात ४५०० रुपये शेकडा या बाजारभावाने खरेदी करून किरकोळ बाजारपेठेत याची विक्री अधिक किमतीत होत आहे.

किरकोळ दर (प्रतिकिलो)घाऊक दर (प्रति (क्विंटल) आवक (क्विंटल)
टमाटा१००५०० ते ४५००३६२६
गिलके १२० २४०० ते ५४१६ १००
दोडके १२० ६६८५ ते १०८३० २४३
मिरची १०० ५००० ते ८६०० १५०
काकडी ६० १५०० ते ४००० १८७४
फ्लावर ५० ७१५ ते २८४० ८६६
कोबी ५० ७५० ते १९२५ ७८१
भोपळा ३० १००० ते २६६५ १३१५
वांगे ८० ३००० ते ४७५० ४८५
कारले १२० ५८३० ते ८९१५ ४९०
ढोबळी मिरची १०० ६२४० ते ८७५० ३०६
- Advertisment -

ताज्या बातम्या