Friday, November 22, 2024
Homeनाशिकमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाशकात आगमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नाशकात आगमन

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यादरम्यान शहरातील विवध विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे काही वेळापूर्वी ओझर विमानतळावर (Ozer Airport) आगमन झाले असून त्यांचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी स्वागत केले आहे. यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : ‘माझी वसुंधरा’ अभियानात नाशिक जिल्ह्याला तब्बल १५ बक्षिसे जाहीर; ७.५ कोटींच्या बक्षिसांची लयलूट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मध्य नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांच्या प्रयत्नातून त्र्यंबकरोड येथे दूध डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

हे देखील वाचा : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन; नेमकं कारण काय?

तर मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या संकल्पनेतून नाशिकमधील मुंबई नाका (Mumbai Naka) येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व देवेंद्र फडणवीस, नरहरी झिरवाळ, दादा भुसे, गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

हे देखील वाचा : IND vs BAN 2nd Test : पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द; चाहत्यांच्या आशेवर पाणी

त्यासोबतच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गंगापूररोड (Gangapur Road) पंपिंग स्टेशन येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडणाऱ्या स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे महाकवी कालिदास कलामंदिर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार व कृतज्ञता सोहळा होणार आहे. याप्रसंगी ध्वजारोहण, श्रीमूर्तीपूजन, संतपूजन, कृतज्ञता सोहळा, धर्मसभा, महाप्रसाद आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

हे देखील वाचा : नाशिकमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे आज लोकार्पण

मंत्री भुजबळ रुग्णालयातून थेट विमानाने नाशिकमध्ये कार्यक्रमासाठी दाखल

दोन दिवसांपूर्वी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन होणार असल्याने या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ हे रुग्णालयातून विशेष विमानाने (Plane) नाशिकला (Nashik) दाखल झाले आहेत. तसेच कार्यक्रम आटोपल्यानंतर भुजबळ पुन्हा मुंबईत जाऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या