Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशAssembly Election Result 2024 : अरुणाचलमध्ये पुन्हा भाजपची सत्ता

Assembly Election Result 2024 : अरुणाचलमध्ये पुन्हा भाजपची सत्ता

सिक्कीममध्ये कुणाला कौल?

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा (Loksabha) निवडणुकीची रणधुमाळी काल शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर थंडावली आहे. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा ४ जूनच्या निकालाकडे लागल्या आहेत. मात्र, या निकालापूर्वीच काल विविध संस्थांकडून एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात आले. या एक्झिट पोलनुसार ३५० पेक्षा अधिक जागा जिंकून एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, तर इंडिया आघाडीला १२५ ते १५० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी भाजपसह एनडीएला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अशातच आता भाजपला (BJP) अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६० जागा असून आतापर्यंत एकूण ५० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपने ४१ जागांवर विजय मिळवला असून ५ जागांवर आघाडीवर आहेत. तर नॅशनल पीपल्स पार्टीने ४ जागांवर विजय मिळवला असून १ जागेवर आघाडीवर आहेत. तसेच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसही (Congress) अरुणाचल प्रदेशात दोन जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसचा उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे. तसेच एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला असून दोन ठिकाणी अपक्ष आघाडीवर आहेत. याशिवाय पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने देखील दोन जागांवर विजय मिळवला आहे.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या ६० जागांसाठी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आज निकाल जाहीर झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अरुणाचल प्रदेशात ४१ जागांवर विजय मिळविला होता. तर जनता दलला (युनायटेड) ७, नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) ५, काँग्रेसला ४ आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलला (पीपीए) १ जागा मिळाली होती. तसेच दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

सिक्कीममध्ये पुन्हा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला कौल

सिक्कीमच्या (Sikkim) विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने घवघवीत यश मिळवले आहे. सिक्कीमध्ये विधानसभेच्या ३२ जागा आहेत. यापैकी सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने २१ जागांवर विजय मिळवला आहे. तर १० जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला केवळ १ जागा मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या