Friday, October 18, 2024
Homeमुख्य बातम्या…तर केजरीवाल यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका; 'कोमातही जाऊ शकता'

…तर केजरीवाल यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका; ‘कोमातही जाऊ शकता’

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी तिहार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार जेलमध्ये कैद आहे. यादरम्यान आम आदमी पक्षाकडून वारंवार त्यांच्या प्रकृतीचा दाखल देत प्रशासनावर गंभीर आरोप केले जात आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या मेडिकल रिपोर्टवर आम आदमी पक्षाची प्रतिक्रिया आली आहे. तिहार जेलमध्ये शुगर लेव्हल अनेक वेळा खाली गेल्याची माहिती आपचे खासदार संजय सिंह यांनी दिली आहे. शुगर लेव्हल कमी झाल्यामुळे अरविंद केजरीवाल झोपेत कोमात जाऊ शकतात. तसेच यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोकाही असतो. तिहार जेलच्या रिपोर्टनुसार, त्यांचे वजनही कमी झाले आहे.

यापूर्वी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वजनाबाबत आप नेते आणि दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांचे ८.५ किलो वजन कमी झाल्याचा दावा आप सरकारचे मंत्री, खासदार आणि इतर सातत्याने करत आहेत. यानंतर तिहार जेलच्या अधीक्षकांनी अरविंद केजरीवाल यांच्या वजनाबाबत सुरू असलेल्या दाव्यावर दिल्ली सरकारच्या गृह विभागाला पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

जेल सुपरिटेंडेंट यांच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवाल १ एप्रिल २०२४ रोजी पहिल्यांदा तिहार जेलमध्ये आले तेव्हा त्यांचे वजन ६५ किलो होते. अरविंद केजरीवाल १० मे रोजी तिहार जेलमधून बाहेर पडले तेव्हा त्यांचं वजन ६४ किलो होते. २ जून रोजी सरेंडर केले तेव्हा त्यांचे वजन ६३.५ किलो होते. सध्या त्यांचे वजन ६१.५ (१४ जुलै) किलो आहे.

कमी प्रमाणात अन्न खाल्ल्याने किंवा कमी कॅलरी घेतल्यानेही वजन कमी होऊ शकते अशी माहिती जेल सुपरिटेंडेंट यांनी दिली आहे. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अरविंद केजरीवाल यांची दररोज तपासणी केली जाते. याशिवाय न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल याही मेडिकल बोर्डशी सल्लामसलत करताना उपस्थित असतात.

दिल्ली सरकारचे काही मंत्री, एक विद्यमान खासदार आणि आम आदमी पक्षाच्या इतर आमदारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे बिनबुडाचे आरोप केले आहेत, असे या पत्रात लिहिले आहे. तुरुंग प्रशासनाला घाबरवण्याच्या उद्देशाने खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे असा दावा त्यांनी केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या