Friday, June 21, 2024
Homeशब्दगंधबोहाडा

बोहाडा

वैजयंती सिन्नरकर

- Advertisement -

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

संजय आणि त्याचा परिवार चालत असतांनाच ‘अंबा माता की जय’ असा आवाज त्यांच्या कानावर आला आणि संजय म्हणाला मुलांनो, आता तुम्हाला एक आगळी वेगळी कला दिसणार आहे. मुले धावत बोहाडा लोककलेच्या तंबू जवळ आले. संजय त्यांना माहिती देऊ लागला. संगणकीय युग, सोशल मीडियाच्या काळात मनोरंजन ही संकल्पनाच बदलत गेली तरी पारंपरिक लोककला आजही जिवंत आहेत. पूर्वीच्या काळी लोककलास मनोरंजनाची साधने असल्याने त्यांचा गाजावाजा अधिक होता. म्हणजेच लोककलांचा जमाना होता. जलसा या लोककलेच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांच्या कार्यांची माहिती देखील लोकांपर्यंत पोहोचवली जात होती. राज्यभर राष्ट्रपुरुषांवर आधारित कार्यक्रमांमध्ये हे जलसे होत असत.

बोहाडा म्हमजे लोककलेतील मनोरंजनाची सर्वात मोठी कला. शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या बोहाडा यांत्रिक युगातही खान्देशमध्ये टिकून आहे. त्याचे स्वरूप बदललेले असले तरी बोहाड्यातील कथा मात्र त्याच आहेत. रामायण, महाभारतावर आधारित कथेवरच सर्वाधिक बोहाडे लोकप्रिय झाले आहेत, अन्य कथांचाही बोहाड्यात समावेश केला जातो. महाराष्ट्रातील आदिवासी भागात बोहाडा नावाने मुखवट्यांचा किंवा सोंगाचा उत्सव होतो. विशेषतः ठाणे , नगर व नाशिक जिल्ह्यात साधारण चैत्र, वैशाखात हा उत्सव आयोजित करण्यात येतो.

उत्तर महाराष्ट्रामध्ये चांदोरी, (ता. निफाड) अकोले (जि. नगर) लोणारवाडी (ता. सिन्नर), जानोरी (ता. दिंडोरी), मुखेड (ता. येवला) या ठिकाणचे बोहाडा उर्फ आखाडी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील दाभाडी, खडकी, खमताने, कंधाने, निकवेल, उमराणे, पिंगळवाडी, देवळा आदी ठिकाणी बोहाडेचे कार्यक्रम होतात.

बोहाडा तीनशे वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा उत्सव आहे. साधारणतः 13 ते 15 दिवस चालणारा हा उत्सव आषाढ महिन्यात सुरू होतो. देव देवतांचे मुखवटे धारण करणे, वेश परिधान करणे, पारंपरिक वाद्य संबळ व पिपाणीच्या तालावर मिरवणूक काढणे, असा हा उत्सव. कागदाचे लगदे, जंगलातील झाडे यांचा वापर मुखवट्यांसाठी केलेला असतो. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोंगे काढली जातात, त्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते, जगदंबा व महिषासुराच्या युद्धात महिषासुराचा वध करून विजयी जगदंबेच्या मिरवणुकीने यात्रेची व कार्यक्रमाची सांगता होते.

या उत्सवात देव, देवी, दैत्य, हिंस्त्र श्वापदे, ऐतिहासिक व पौराणिक व्यक्ती यांची सोंगे घेत पुराणकथा सादर केल्या जातात. गणपती, सरस्वती, रक्तादेवी, कालिका, दैत्य, राम, रावण, हनुमान अशी कितीतरी सोंगे घेतली जातात. मुखवटे व त्याबरोबरच प्रभावळी बांधून ही सोंगे नाचत मंडपात येऊन सूत्रधार, गाडीवान यांच्या सहकार्याने पुराणकथा सादर करतात. सामान्यतः उत्सव सांगतेच्या आदल्या रात्री सोंग नाचविण्याची प्रथा आहे. या उत्सवास भवाडा असेही म्हणतात.

संजय आणि त्याचा परिवार आज आगळ्यावेगळ्या कलेकडे येत असतांनाच

‘अंबा माता की जय’

असा आवाज त्यांच्या कानावर आला. आणि संजय म्हणाला मुलांनो, आता तुम्हाला एक आगळी वेगळी कला दिसणार आहे.

पुन्हा एकदा

‘अंबा माता की जय’

हा आवाज त्यांच्या कानावर आला. मुले धावत, धावत बोहाडा लोककलेच्या तंबू जवळ आले. मुले या कलेकडे एकटक पहात असतांंनाच संजय त्यांना माहिती देऊ लागला.

पूर्वीच्या काळी लोककलास मनोरंजनाची साधने असल्याने त्यांचा गाजावाजा अधिक होता. म्हणजेच लोककलांचा जमाना होता. जलसा या लोककलेच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांच्या कार्यांची माहिती देखील लोकांपर्यंत पोहोचवली जात होती. राज्यभर राष्ट्रपुरुषांवर आधारित कार्यक्रमांमध्ये हे जलसे होत असत बोहाडा म्हमजे लोककलेतील मनोरंजनाची सर्वात मोठी कला. शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या बोहाडा यांत्रिक युगातही खान्देशमध्ये टिकून आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी भागात बोहाडा नावाने मुखवट्यांचा किंवा सोंगाचा उत्सव होतो. विशेषतः ठाणे, नगर व नाशिक जिल्ह्यात साधारण चैत्र, वैशाखात हा उत्सव आयोजित करण्यात येतो. तीन, पाच किंवा सात दिवस चालणार्‍या या उत्सवास आखाडा किंवा आखाडी असेही नाव आहे. हा उत्सव देवीची यात्रा म्हणूनही साजरा केला जातो. सकाळ उजेड होईपर्यंत मशाली पेटवून ही सोंगे नाचविली जातात.

देव देवतांचे मुखवटे धारण करणे, वेश परिधान करणे, पारंपरिक वाद्य संबळ व पिपाणीच्या तालावर मिरवणूक काढणे, असा हा उत्सव रात्री सुरू होतो. काठीला कापड बांधून तयार केलेली मशाली पेटवून ही सोंगे सकाळ पर्यंत नाचवली जातात. कागदाचे लगदे, जंगलातील झाडे यांचा वापर मुखवट्यांसाठी केलेला असतो. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोंगे काढली जातात, त्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते, जगदंबा व महिषासुराच्या युद्धात महिषासुराचा वध करून विजयी जगदंबेच्या मिरवणुकीने यात्रेची व कार्यक्रमाची सांगता होते.

भारतात केरळ, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या दक्षिणात्य भागात यक्षगान स्वरूपात तसेच श्वापदे, देवीदेवता यांच्या मुखवट्यांसह हा उत्सव होतो. दादरानगर हवेली, सिक्कीम, आसाम, नागालँड, मिझोराम, हिमाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा अशा आदिवासी बहुल पूर्वांचलात हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. सर्वत्र मुखवट्यांसह नृत्योत्सवांना महत्त्व असते.

जगभरात विविध प्रकारचे मुखवटा नृत्ये सादर होतात. सर्वदूर पौराणिक व धर्मधारणात्मकतेने हे उत्सव साजरे होतात. हे लक्षणीय आहे. यात आफ्रिका, युरोप हे खंड मागे नाहीत.

बोहाडा हे नाचकाम करतांना करण्याचे नाट्य असून, यात पूर्वी सोंगांचा कार्यक्रम आठवडाभर चालायचा, परंतु आता एकच दिवस होतो. मते दाजी नावाचे अवलिया. नाशिकमध्ये शंभर वर्षांपूर्वीपासून मुरलीधर काशिनाथ मते यांचे घराणे बोहाड्याची परंपरा चालवत आहेत.उत्तर महाराष्ट्र त्यांना मते दाजी म्हणूनच ओळखतो. बोहाडा ही अस्तांगत होत चाललेली लोककला जिवंत ठेवण्यात मते दाजींचा मोठा सहभाग असून, विविध सोंग तयार करणे आणि नाचवणे याची परंपरागत माहिती असणारे मते एकमेव आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी 25 किलो वजनाचे असलेले आणि 120 मेणबत्ती अंगावर वागवणार्‍या वीरभद्राचे सोंग नाचवणे, हे मते दाजींचे वैशिष्ट्य.

मुखवटे धारण करणे हा कार्यक्रमाचा एक भाग असतो. हे मुखवटे, देव देवतांचे व इतर प्रकाराचे असतात. ते घालून सोंगे नाचविणे हा एक भाग असतो.

मुखवटे चढवूनी सोंगे घेतली जातात, आध्यात्मिक कथाही त्यातूनी ते सांगतात. नृत्ये सादर करूनी लक्ष वेधूनी घेतात. मशाली पेटवूनी सोंगे रात्रभर नाचतात.

मुले याच कलेच्या चर्चेत रंगून पुढील कलेच्या दिशेने निघाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या