Saturday, July 27, 2024
Homeनाशिकआदिवासी बांधवांचा 'या' मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

आदिवासी बांधवांचा ‘या’ मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

इगतपुरी । प्रतिनिधी

एकीकडे केंद्र सरकार स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत सर्व सामान्यांना मोफत धान्याचे वाटप करत असताना आणि महाराष्ट्र शासन सुद्धा सर्व सणासुदीला आनंदाचा शिधा वाटप करत आहे. मात्र दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील हजारो आदिवासी कातकरी कुटुंबे अजूनही शिधाकार्ड पासून व मोफत धान्यापासून वंचित असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

- Advertisement -

अनेकदा इगतपुरी येथील तहसीलदार यांच्याकडे अर्ज करूनही आश्वासना पलीकडे काहीही मिळत नाही. गेल्या वर्षभरापासून दर महिन्याला तालुक्यातील आदिवासी बांधव तहसील कार्यालयात येऊन चौकशी करतात मात्र पुढील महिन्यात होईल असे आश्वासन गेल्या वर्षभरापासून देत आहेत. तर अनेक आदिवासी कुटुंबाला मिळणारे धान्य गेल्या तीन महिन्यांपासून अचानक बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आमदार अपात्र होतील यामुळे…; आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गटाची आक्रमक भुमिका

आज अखेर आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने इगतपुरी तहसील कार्यालयावर शिधा पत्रिकेच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणुक करून आदिवासींचे प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे, गेल्या तीन महिन्यांपासून आधार शिडींगच्या नावाखाली बंद केलेले धान्य त्वरीत देण्यात यावे, वर्ष भरापासुन रेशन कार्डसाठी आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयात अर्ज केले आहेत त्यांना त्वरीत नवीन रेशनकार्ड देण्यात यावे आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी संस्थापक अध्यक्ष पांडूबाबा पारधी, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सिताराम गावंडा, सहसचिव सुनील पारधे, जिल्हाध्यक्ष आकाश भले, महिला अध्यक्ष मीराताई सराई, उपाध्यक्ष हिराताई सराई, तालुकाध्यक्ष दिपक शेंडे, सोशल मीडिया प्रमुख अशोक म्हसणे यांच्यासह शेकडो आदिवासी महिला उपस्थित होत्या.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या