Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनवनीत राणांच्या वक्तव्यावर ओवेसींचं प्रत्यूत्तर, म्हणाले, "तुम्ही चार नाही तर…"

नवनीत राणांच्या वक्तव्यावर ओवेसींचं प्रत्यूत्तर, म्हणाले, “तुम्ही चार नाही तर…”

अमरावती | Amravati
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राष्ट्रीय नेत्यांच्या एन्ट्रीने राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अमरावतीत जाहीर सभा घेत भाजप नेत्या नवनीत राणा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. असदुद्दीन ओवैसींनी माजी खासदार नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केलाय.. तुम्ही चार नव्हे, तर आठ मुले जन्माला घाला, असा टोला त्यांनी लगावला आहे… हिंदूंनी किमान ४ मुले जन्माला घालावीत असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या त्यावर आता ओवैसींनी पलटवार केला.

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा दाखला देत हिंदूंना आवाहन केले होते की, “जर ते १९ मुले जन्माला घालत असतील, तर आपणही किमान ४ मुलं जन्माला घातली पाहिजेत.” राणांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच विधानाचा धागा पकडून ओवेसींनी अमरावतीच्या सभेत पलटवार केला.

- Advertisement -

उमर खालिद, शरजील इमामला जामीन नाहीच; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल, काय म्हंटले निकालात

YouTube video player

असदुद्दीन ओवेसी यांनी भाषणात नवनीत कौर राणा यांना टोला लगावताना म्हंटले की, तुम्ही चार नाही तर २० मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचे आहे, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, भारत हा तरुणांचा देश आहे आणि मोठ्या प्रमाणावर 40 वर्षांखालील तरुणांची संख्या आहे. ”त्यांना तुम्ही नोकऱ्या देत नाहीत. मोदी म्हणतात की आम्ही नोकर्‍या नाही देऊ शकत तुम्ही गोरक्षक बना, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.

सभेत बोलताना ओवेसी म्हणाले, “मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, नवनीत राणा म्हणतात ४ मुलं जन्माला घाला. मी सांगतो तुम्ही ८ मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही. पण तुम्ही केवळ द्वेषाचे राजकारण करत आहात.” त्यांनी पुढे जोडले की, अशा प्रकारच्या वक्तव्यांनी जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून भरकटवले जात आहे.

याच सभेत ओवैसींनी अजित पवारांचाही चांगला समाचार घेतला. ते म्हणाले, “अजित पवारांकडे बोलण्यासाठी आता काही उरलेले नाही. आधी त्यांनी राज्यासाठी काय केले ते सांगा.” महाराष्ट्रातील मॉब लिंचिंगचा मुद्दा उपस्थित करत ओवैसींनी २०१४ मधील जळगाव येथील मोसिन शेख प्रकरणाचा उल्लेख केला आणि या प्रकरणात न्याय न मिळाल्याचा आरोप केला. “गुन्हा झाला, केस संपली पण न्याय मिळाला नाही,” असे ते म्हणाले. मात्र अमरावतीमध्ये इथले लोक म्हणतात “दादा बोलले, दादा बोलले पण दादा कोण आहे हे माहीत आहे का?,” अशी टीका त्यांनी केली. राज्यात कायदा-सुव्यवस्था, अल्पसंख्यांकांची सुरक्षा आणि न्याय या मुद्द्यांवर सरकार उत्तर देत नसल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट जबाबदारी स्विकारण्याचे आव्हान दिले.

ताज्या बातम्या

श्रीनावास

Ajit Pawar Death: अजितदादांचे कोणतेही धार्मिक विधी होणार नाही; भाऊ श्रीनावास...

0
बारामती | Baramatiमहाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. येत्या ६ जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणे...