Thursday, April 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAsha Bhosle Funeral : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; दुपारी...

Asha Bhosle Funeral : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन

मुंबई | Mumbai

संगीत विश्वावर आठ दशके अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) (वय ९३ ) यांनी रविवारी दक्षिण मुंबईतील (South Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हाते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. १३) दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील चिरतरुण आवाज हरपला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात सुरु होते उपचार

आशा भोसले यांचे पार्थिव आज (सोमवारी) सकाळी ११ ते ३ दरम्यान लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. काल (रविवारी) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखले जायचे. त्यांनी केवळ हिंदीतच नव्हे तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह इंग्रजी, रशियन, नेपाळी, मल्याळम, तमिळ अशा अनेक भाषांमध्ये आपली जादू पसरवली आहे.

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे झाला. त्यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात अत्यंत कमी वयात केली होती. एका मुलाखतीत (Interview) त्यांनी स्वतः सांगितले होते की, १९४३ मध्ये वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी त्यांनी आपले पहिले मराठी गाणे रेकॉर्ड केले होते. १९४३ साली प्रदर्शित झालेल्या ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटात त्यांनी आपले पहिले गाणे गायले. ‘चुनरिया’ या चित्रपटासाठी गायलेले सावन आया हे त्यांचे पहिले गाणे होते. १९४९ साली, वयाच्या १६ व्या वर्षी, आशा भोसले यांनी ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले, जे त्यांचे वैयक्तिक सचिवही होते.

हे देखील वाचा : Asha Bhosle Passed Away : आशाताईंच्या निधनामुळे मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला – मुख्यमंत्री फडणवीस

हिंदी सिनेविश्वातील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. दम मारो दम आणि ओम शांति ओम यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यानी इंडस्ट्रीला दिली. शास्त्रीय संगीत असो, कव्वाली, पॉप किंवा डिस्को गाणी, आशाताईंनी प्रत्येक प्रकारच्या गाण्याला न्याय दिला. पिया तू अब तो आजा (कार), ये मेरा दिल (डॉन), ओ हसीना जुल्फोंवाली (तिसरी मंझिल), दिवाना हुआ बादल आणि इशारों इशारों में (काश्मीर की कली) ही त्याची विशेष गाणी, सन्मान त्यांच्या कलेचा म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण आणि चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने (Award) गौरवले आहे.

आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार

  • पद्मविभूषण : २००८
  • दादासाहेब फाळके पुरस्कार : २०००
  • राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (सर्वश्रेष्ठ महिला प्लेबैंक गायिका) : १९८१ व १९८६
  • फिल्मफेअर पुरस्कार (सर्वश्रेष्ठ महिला प्लेबैंक गायिका) १९६८, १९६९, १९७२, १९७३, १९७४, १९७५ और १९७९
  • फिल्मफेयर स्पेशल अवॉर्ड (फिल्म रंगीला) : १९९६
  • फिल्मफेयर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड : २००१
  • सर्वश्रेष्ठ महिला प्लेबैक गायिका : २००२, फिल्म ‘लगान’ के गीत ‘राधा कैसे न जले’ के लिए
  • नाइटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड : १९८७
  • सिंगर ऑफ द मिलेनियम : २००० (दुबई)
  • लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड : २००२

ताज्या बातम्या

​Nashik News : कर्तव्याचा मार्ग ठरला शेवटचा प्रवास; होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik समाजाच्या सुरक्षिततेसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या एका ‘खाकी’ वर्दीतील सेवकाचा कर्तव्यावर असतानाच मृत्यु (Death) झाला. अंबड पोलिस ठाण्यात (Ambad...