Monday, May 20, 2024
Homeनगरआशा वर्कर व गट प्रवर्तकांची जिल्हा परिषदेत निदर्शने

आशा वर्कर व गट प्रवर्तकांची जिल्हा परिषदेत निदर्शने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी सोमवारी (दि.30) जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन धरणे व जेलभरो आंदोलन केले. तर आशा सेविकांना कामावर हजर होण्यासाठी बजावण्यात आलेल्या नोटिसांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर होळी करण्यात आली. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते.

- Advertisement -

दबाव तंत्राने बळजबरीने करून घेतले जाणारे ऑनलाईनचे काम बंद होण्यासाठी जिल्ह्यातील 3 हजार 200 आशा सेविका व 190 गट प्रवर्तक संपावर आहेत. संप पुकारून देखील प्रलंबीत मागण्यांकडे लक्ष न देता नोटीस बजावल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आयटकचे राष्ट्रीय सदस्य कॉ. सुधीर टोकेकर, संघटनेच्या अध्यक्षा सुवर्णा थोरात, मार्गदर्शक कारभारी उगले, जिल्हा संघटक कॉ. सुरेश पानसरे, उषा अडागले, शोभा गायकवाड, कविता गिरे, शारदा काळे, वर्षा चव्हाण, सुप्रिया जाधव, स्मिता ठोंबरे, कोल्हार शेजुळ, जयश्री गुरव, अश्विनी गोसावी, सविता धापटकर, सुनीता साळवे, धामणे सुनीता, नसरीन पठाण, स्वाती इंगळे, वैशाली वाळुंज, वैजयंती गायकवाड, रेखा अवसरे, लक्ष्मी भांगरे, रुपाली सोनवणे, सविता शिंदे, शोभा इंगोले, व्ही.बी. त्रिभुवन, आशा गुलदगड, प्रमिला गव्हाणे, लक्ष्मी कुलट, गौरी पवार, अमृता कचवे, झाडे शोभा, रुपाली हुसाळे, वंदना रोकडे, त्रिभुवन, अंबिका भालेराव आदींसह जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बुरुडगाव येथील भाकपच्या कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली.

जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकला असता यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना अटक करून कोतवाली पोलीस स्टेशनला आणण्यात आले. काही वेळानंतर त्यांना सोडण्यात आले. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, आरोग्य अधिकारी आशा सेविकांना नोटीस बजावून कामावर हजर होण्यास सांगत आहे. कामावर हजर न झाल्यास मानधन रोखून कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संप कायदेशीर असून, नियमाने अगोदर नोटीस देऊन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मागणीचे निवेदन आ.संग्राम जगताप व आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या