Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVijay Wadettiwar: अशोक खरात वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकमेकांच्या…; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

Vijay Wadettiwar: अशोक खरात वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकमेकांच्या…; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

नागपूर | Nagpur
नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याने अध्यात्म आणि भीतीचा वापर करुन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचे काळे आणि विकृत कृत्यांनी संपुर्ण राज्य आणि देश हादरला आहे. खरात अटकेत असून त्याची एसआयटी मार्फत चौकशी सुरु असून यातून रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. खरात प्रकरणात राजकीय कनेक्शनही समोर आले असून त्याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत नावे जोडली गेली आहे. या प्रकरणाचा ताबा विशेष तपास पथकाने घेतला असून खरातच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक पीडिता आता समोर येत आहेत. असे असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी आणखी एक दावा केला आहे.

भोंदू बाबा अशोक खरात याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे होते. तो या बड्या अधिकाऱ्यांना एकमेकांच्या फॅमिली शेअर करायला सांगायचा, असा स्फोटक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्य सरकार या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही कारण त्यांना भीती वाटते, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

Ashok Kharat Crime News : खरातच्या मोबाईलचा ‘क्लोन’ तयार; बड्यांची गुपिते उघडणार, पंटरही रडारवर

वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
अनेक सरकारी अधिकारी आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना घेऊन अशोक खरात याच्याकडे जात होते. जे पती आपल्या पत्नीला खरात कडे पाठवत होते, ते पती पण तितकेच दोषी आहे. त्यांची पण चौकशी करून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

एकमेकांच्या बायका शेअर करायला सांगायचा
अशोक खरात हा अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायका शेअर करायला सांगायचा. हे किती घाणेरडं आणि महाराष्ट्राची इभ्रत काढणारं प्रकरण आहे. तरीही राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाला त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजे
अनेक मोठमोठ्या लोकांच्या बायका अशोक खरात याच्या ऑफिसमध्ये जात होत्या. त्यांचे नवरे बाहेर बसून राहायचे. हे अधिकारी भोंदूगिरीला, अंधश्रद्धेला समर्थन द्यायचे. बाकी आतमध्ये काय झाले, याबद्दल मी बोलणार नाही, त्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत. सध्या समोर येणारे व्हिडीओ सिलेक्टेड आहेत. अशोक खरातच्या ऑफिसमध्ये सापडलेल्या पेनड्राईव्हमध्ये 1000 व्हिडीओ आहेत, पण त्यापैकी फक्त 150 व्हिडीओ समोर आले आहेत. ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाला त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला सर्वाधिक 255 रुपये किलोचा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 7139 कॅरेटची आवक...