Thursday, April 30, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : खरातच्या मोबाईलचा 'क्लोन' तयार; बड्यांची गुपिते उघडणार,...

Ashok Kharat Crime News : खरातच्या मोबाईलचा ‘क्लोन’ तयार; बड्यांची गुपिते उघडणार, पंटरही रडारवर

कोठडीत तीन दिवसांची वाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भविष्याची भिती दाखवून अनेक महिलांना वासनेची शिकार बनविणारा नाशिकचा ‘जेफ्री एप्स्टीन’ व स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पापांचा पाढा आता ‘डिजिटल’ पुराव्यांतून वाचला जाणार आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik District Court) रविवारी (दि. २९) खरातच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत म्हणजेच तीन दिवसांची चाढ केली आहे. खरातच्या जप्त मोबाईलमधील ‘क्लोन डेटा’ एसआयटीच्या हाती लागला असून, आता त्याच्या उपस्थितीतच या डेटाचे ‘पोस्टमार्टम’ केले जाणार असल्याने अनेक बड्चांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने ‘व्यवसायात वृद्धी होईल’ असे सांगून उकळले तब्बल ‘इतके’ लाख; पीडितांचे एसआयटीला कॉल

पोलीस कोठडीची (Police Custody) मुदत संपल्याने खरातला रविवारी (दि. २९) साडेअकरा वाजता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (चौदावे) एम. व्ही. भराडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा एसआयटीचे अधिकारी तथा कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयाला महत्त्वाची माहिती दिली. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून खरातच्या मोबाईलमधील संपर्क क्रमांक आणि इतर डेटाची ‘क्लोन कॉपी’ मिळवण्यात पथकाला यश आले आहे. खरातने त्याच्या संपर्कातील व्यक्तींची नावे व क्रमांक खऱ्या नावाने सेव्ह केले आहेत की डुप्लिकेट नावांनी, याचा तपास आता त्याच्या समक्ष केला जाईल. या विश्लेषणामधून खरातच्या संपर्कातील ‘त्या’ अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडी पुन्हा वाढवली, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, खरातचे गुन्हे (Crime) करण्याचे स्वरूप नियोजनपूर्वक होते. तो पीडित महिलांना खाण्यासाठी पेढा आणि पिण्यासाठी ‘खारट किंवा कडवट चवीचे पाणी देत असे. हे पाणी प्यायल्यानंतर महिलांना गरगरल्यासारखे आणि मळमळल्यासारखे होऊन त्यांचे डोके जड होत असे. महिला अर्धवट शुद्धीत असताना खरात जसे बोलेल, तसे त्या त्याच्या प्रभावाखाली वागत. याचाच गैरफायदा घेऊन तो ऑफिसचे लाईट बंद करून महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता. हे गुंगीचे पदार्थ तो कोठून व कुणाकडून आणत होता, याचा तपास बाकी असून कोठडीतील तपासात खरातने मौन पाळले असून तो सहकार्य करत नसल्याची माहिती तपास पथकाने न्यायालयात सादर केली.

हे देखील वाचा : Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT च्या रडारवर; चौकशीसाठी बजावले समन्स

न्यायालयात कडेकोट बंदोबस्त अन् चेकिंग

संवेदनशील प्रकरण असल्याने सीबीएस येथील न्यायालयाच्या जुन्या इमारतीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिसांनी मुख्य गेट बंद करून प्रत्येकाच चौकशी व चेकिंग केल्यानंतरच प्रवेश दिला. सुमारे सव्वा तास चाललेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यानंतर एसआयटीने कडेकोट बंदोबस्तात त्याला सुरक्षितस्थळी हलविले. येत्या तीन दिवसांत या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची चिन्हे आहेत.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Case : खरातची ‘शस्त्र कुंडली’ उघड; पोलीस रेकॉर्डमधून पुरावेच गायब

खरातचे पंटर रडारवर

सहायक सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. यावेळी अभियोग कक्षाच्या सहायक संचालक अॅड. किरण भेंडकर उपस्थित होत्या. ‘खरातने भोंदगिरी करून कोणाच्या नावावर किती स्थावर आणि जंगम मालमत्ता गोळा केली, याचा तपास अद्याप बाकी आहे. तसेच, हे लैंगिक अत्याचाराचे साम्राज्य विस्तारताना त्याला कोणी कोणी व कशी मदत केली, याचे धागेदोरे शोधणे आवश्यक आहे,’ असे त्यांनी नमूद केले. पीडितेच्या वतीने अॅड, एम. याय काळे यांनीही बाजू मांडत अनेक पीडितांचे संसार खरातने उ‌द्ध्‌वस्त केले असून तक्रारींची संख्या वाढत असल्याचे सांगितले. तर, खरातच्यावतीने अॅड. सचिन भाटे यांनी युक्तिवाद करून वाढीव पोलीस कोठडीला विरोध केला.

यासाठी कोठडी

  • डिजिटल पुराव्यांचे पोस्टमार्टम बाकी
  • गुंगीच्या औषधांचा स्रोत घेणे
  • बेनामी मालमत्तांचा तपास करणे
  • सहकाऱ्याऱ्यांचे ‘नेटवर्क’ शोधणे
  • आर्थिक व्यवहारांची चौकशी करणे

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली, पण...

0
मुंबई | Mumbai विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे सेनेकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते....