Saturday, May 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshok Kharat Case: सावधान! तुमच्याही मोबाईलमध्ये खरातचे 'ते' व्हिडीओ आहे का? लगेच...

Ashok Kharat Case: सावधान! तुमच्याही मोबाईलमध्ये खरातचे ‘ते’ व्हिडीओ आहे का? लगेच डिलीट करा, नाहीतर…

नाशिक | Nashik
भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशोक खरातने राज्यभरातील शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याच्या संपर्कात राज्यातील बड्या राजकारणी लोकांपासून ते उच्चपदस्थ अधिकारी ही आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे आक्षेपार्ह सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

अशोक खरात प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. एसआयटीकडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. तसेच पोलीसही या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पीडित महिलांचेही व्हिडिओ व्हायरल होत आहे. अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केले आहे. आता या प्रकरणी महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोर्टाने खरातच्या पोलीस कोठडीत २९ मार्चपर्यंत वाढ केली असून एसआयटीकडून आता वेगाने तपास केला जात आहे. भोंदू बाबा खरातच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी सुरू असून त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयाची झाडा झडती पोलिसांनी घेतली आहे.

अशोक खरातचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या तीनही संशयित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र टीम रवाना झाल्या आहेत.

अहिल्यानगर पोलिसांनी तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९४ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी राहुल शिंदे याला त्याचा मित्र योगेश आढावने पाठवले. तर योगेश आढाव याला बीड जिल्ह्यातील माजलगावमधील संदीप गरजे याने हे व्हिडिओ पाठवल्याचे पोलीस तपासात समोर आहे. व्हिडिओ पाठवणाऱ्या आरोपींची साखळीच या प्रकरणात पोलिसांनी उघड केली.

‘ताज का राज’ फुटला तर…; अशोक खरात प्रकरणावरुन शिवसेना महिला नेत्यांमध्ये जुंपली; म्हात्रे-अंधारेंमध्ये पेटला ट्विटर वॉर

दरम्यान, सोशल मीडियावर पीडितांचे फोटो किंवा व्हिडीओ फॉर्वर्ड केल्यास कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा फेसबुकवर हे व्हिडीओ शेअर केल्यास त्या ग्रुपच्या अॅडमिनला थेट अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नाेकराने लुटले मालकिणीचे घर; साडेतीन लाखांचे दागिने...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik घरकाम करणाऱ्यांवर दाखवलेला अतिविश्वास पुन्हा एकदा महागात पडल्याची घटना नाशिकमधील (Nashik) उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोडवर (Gangapur Road) उघडकीस...