Friday, May 15, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case: ज्या तरुणीला हाताशी धरून खरातनं खोटी तक्रार नोंदवली, त्याच...

Ashok Kharat Case: ज्या तरुणीला हाताशी धरून खरातनं खोटी तक्रार नोंदवली, त्याच तरुणीनं सत्याची साथ दिली, खरातचा फेक नॅरेटिव्ह उघड

नाशिक | प्रतिनिधी
स्वतःला पीडित भासवून सत्तेच्या जोरावर पोलिसांसह सकारी यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या खरातचा बुरखा पूर्णपणे फाटला आहे. वावी आणि शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल केलेले दोन गंभीर गुन्हे तपासात पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले असून, पोलिसांनी या प्रकरणांत न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. यामुळे खरातने रचलेला खोटारडेपणाचा इमला आता पत्त्यांसारखा कोसळला आहे.

खरातने पुणे येथील व्यावसायिक राजेंद्र जासूद आणि एका पीडितेच्या पतीचा काटा काढण्यासाठी नियोजनबद्ध कट रचला होता. सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून दोन खोट्या फिर्यादी दाखल करायला लावल्या. सुरुवातीला तपास यंत्रणांवर दबाव निर्माण करण्यात खरात यशस्वी झाला होता, मात्र राजेंद्र जासूद आणि संबंधित पीडितेच्या पतीने हार न मानता सत्याचा लढा सुरू ठेवला. त्यांच्याकडे असलेल्या भक्कम पुराव्यांनी खरातने उभे केलेले खोटे नॅरेटिव्ह तांत्रिक तपासात टिकू शकले नाही.

- Advertisement -

Nashik News: इंधन बचतीचे डोस जनतेला, लोकप्रतिनिधींना मात्र गाड्यांचे वेध!

शिर्डी येथील गुन्ह्यात स्वतःची कातडी वाचवण्यासाठी खरातने व्हिडीओ मॉर्फ केल्याचा बनाव रचला होता. मात्र, सायबर तपासात त्याचे सर्व दावे फोल ठरले. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या तरुणीला हाताशी धरून खरातने ही खोटी तक्रार नोंदवली होती, त्या तरुणीनेच आता सत्याची साथ दिली आहे. “खरातने दबाव टाकून आणि खोटे सांगून माझ्याकडून ही तक्रार करून घेतली होती,” अशी स्पष्ट कबुली या तरुणीने दिली आहे. या कबुलीमुळे खरातच्या तथाकथित भोंदूगिरीच्या साम्राज्याचा पायाच उखडला गेला आहे.

खरातसाठी ब्लॅक वीक
एकीकडे दोन गुन्हे खोटे ठरले असताना, दुसरीकडे खरातच्या अडचणींत वाढ होणार आहे. नाशिक सत्र न्यायालयात खरातविरोधात ७५० आणि ४०० पानांची दोन स्वतंत्र दोषारोपपत्रे आधीच दाखल आहेत. आता महिला अत्याचाराच्या अन्य सहा गुन्ह्यांमध्ये अटकेची ६० दिवसांची मुदत संपत असल्याने, येत्या दोन ते चार दिवसांत पोलिस न्यायालयात चार्जशीट (दोषारोपपत्र) दाखल करणार आहेत. तसेच, फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, त्याचे धागेदोरे शोधण्यासाठी एसआयटी व पोलिस खोलवर तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

साखर

साखर निर्यातबंदीचा निर्णय चिंताजनक, खासदार भगरेंकडून निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी

0
पिंपळगाव ब. | प्रतिनिधीकेंद्र सरकारने कच्ची, पांढरी आणि शुद्ध साखरेच्या निर्यातीवर सप्टेंबर २०२६ पर्यंत तत्काळ प्रभावाने बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय हा ऊस उत्पादक शेतकरी,...