Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshok Kharat: अमेरिकेतही खरातचा भक्त परिवार; मंदिराशेजारी आलिशान फार्महाऊस, पण, मंदिराची दानपेटी...

Ashok Kharat: अमेरिकेतही खरातचा भक्त परिवार; मंदिराशेजारी आलिशान फार्महाऊस, पण, मंदिराची दानपेटी रिकामीच!

सिन्नर | प्रतिनिधी
बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने दोन दिवसांपूर्वी अटक केली. संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी काही व्हिडिओ देखील जप्त केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे, या प्रकरणी अनेक व्हिडीओ, फोटो आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात याची सध्या एसआयटी मार्फत चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून नव नवे खुलासे समोर येत आहे.

खरातचा अमेरिकेतही भक्त परिवार
अशोक खरात याचा मोठा भक्त परिवार असल्याची चर्चा आहे. खरातचा भक्त परिवार केवळ जिल्हा, राज्य अन् देशातच नव्हे तर अगदी परदेशातही आहे. अमेरिकेतही त्याचे भक्त आहेत. मंदिराशेजारच्या २५-३० एकरातील खरातचे आलिशान फार्महाऊस दुबईत इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय असणाऱ्या पुण्यातील एका व्यावसायिकाने बांधून दिल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

Ashok Kharat Crime News: अंकशास्त्राप्रमाणे नदीच्या ईशान्येला मंदीर, रविवारच्या दरबारात व्हीआयपींचा राबता; खरातने असं उभं केलं ईशान्येश्वर मंदिर

अन् अमेरिकेच्या वाऱ्या सुरु झाल्या
मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकानेही शिर्डीजवळच्या मंदिरापर्यंत शेकडो भाविक पोहोचवल्याची चर्चा आहे. तिरुपती बालाजी मंदिराचे ट्रस्टीही खरातकडे आकृष्ट झाल्याची त्यावेळी चर्चा होती. ते अनेकदा खरातला घेण्यासाठी चार्टर विमान पाठवायचे, अशीही चर्चा होती. या ट्रस्टींनी अगदी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कुटुंबियांनाही शिर्डीहून परतताना ईशान्येश्वराला आणल्याची चर्चा तेव्हा झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच ईशान्येश्वराला येऊन गेले म्हटल्यावर राजकारणात शिडी चढण्याची मनीषा बाळगणारे शेकडो भक्त येऊ लागले. त्याचवेळी खरातच्या अमेरिका वाऱ्या सुरू झाल्या.

Ashok Kharat Crime News: अंकशास्त्राप्रमाणे नदीच्या ईशान्येला मंदीर, रविवारच्या दरबारात व्हीआयपींचा राबता; खरातने असं उभं केलं ईशान्येश्वर मंदिर

दानपेटी मात्र रिकामी!
वर्षातील दोन महिने अमेरिकेतील भक्तांना भेटण्यासाठी जाणारा खरात भक्तांनी दिलेले लाखो-करोडो रुपये घेऊन भारतात परतू लागला. त्यातून त्याला जमिनी, प्लॉट खरेदीचा छंद लागला. त्यातूनच काही भक्तांशी खटकेही उडायचे. खरातच्या आर्थिक प्रगतीचा आलेख दररोज वेगळी उंची गाठत असताना मंदिराची दानपेटी रिकामीच राहू लागल्यानंतर आवारेंसह त्यांचे इतर सहकारी सावध झाले. त्यांनी विश्वस्तपदाचा राजीनामा देऊन खरातशी, अगदी मंदिराशीही नाते तोडून टाकले. त्यांच्या जागेवर विश्वस्तपदी नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली. मात्र, चाकणकरांचे नाव त्यातून कमी झाले नव्हते. प्रचंड कामाचा व्याप असतानाही त्यांच्या चक्कर व्हायच्याच. उलट आता सोबत त्यांची बहीणही दिसू लागली होती. त्यादरम्यान मुंबईतील भक्तांनाही दिलेले काही शब्द खरात यांनी पाळले नसल्याची चर्चा होऊ लागली. पोलिसांपर्यंतही काही प्रकरणे गेली. मात्र, त्यापुढे ती सरकत नव्हती. शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळापासून खरातांचा मुंबईतला मुक्कामही वाढला होता. शिंदेंकडूनच त्यांच्या खर्चाची सर्व तजवीज केली जात असल्याचीही चर्चा तेव्हा दबक्या आवाजात व्हायची. खरातची इस्टेट वाढत असल्याचे दिसत असले तरी त्याची मजल त्यांच्याच महिला भक्तांच्या छळापर्यंत पोहोचली असेल असे कोणाला वाटले नव्हते.

कॅप्टनच्या कुकर्माचा घडा भरला
महिलांच्या लैंगिक शोषणाचे १०० हून अधिक व्हिडिओ असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या व्हिडिओंमधून ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्या नावाखाली अशोक खरातने महिलांचे शोषण केल्याचे समोर येत आहे. यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केले असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. या SIT मध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील १२ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कॅप्टन खरात याने महिला अत्याचार केल्याचे १०० हुन अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela 2027 – रस्ते विकासकामांना वेग; रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता नियंत्रण...

0
नाशिक : प्रतिनिधी Nashik सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांना वेग आला असून, कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या (NTKMA) गुणवत्ता नियंत्रण पथकाने तीन...