Monday, August 17, 2026
HomeनाशिकAshok Kharat Crime News: अंकशास्त्राप्रमाणे नदीच्या ईशान्येला मंदीर, रविवारच्या दरबारात व्हीआयपींचा राबता;...

Ashok Kharat Crime News: अंकशास्त्राप्रमाणे नदीच्या ईशान्येला मंदीर, रविवारच्या दरबारात व्हीआयपींचा राबता; खरातने असं उभं केलं ईशान्येश्वर मंदिर

सिन्नर | प्रतिनिधी
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नाशकात त्यांच्याविरोधात महिलेच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कॅप्टन अशोक खरातचे हिडीस रूप सिन्नरकरांसमोर आले. असे काही अघटित मंदिराच्या, ज्योतिष सांगण्याच्या आड होत असेल यावर कुणाचा विश्वासच बसेना. त्यामुळे जवळपास ७२ तासांपासून सिन्नरकरांमध्ये याच विषयाची चर्चा होत आहे.

मंदिराच्या उभारणीची रंजक कहाणी
मिरगाव येथे अंकशास्त्राप्रमाणे नदीच्या ईशान्येला उभारलेल्या मंदिरासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत आर्थिक मदत आली. या मंदिराच्या उभारणीची कहाणीही रंजक आहे. या मंदिराच्या बांधणीसाठी खास नेवासा येथून दगड मागवण्यात आला होता. मंदिराच्या पायापासून कळसापर्यंत एकच कारागीर काम करीत होता. सन २०१० मध्ये हे मंदिर बांधून तयार झाले. नामकर्ण आवारेंसह घुमरे व इतरांनी स्वतःचे काम समजून दिवसरात्र मंदिर उभारणीत लक्ष घातले. दरम्यानच्या काळात सिन्नर शहराच्या बाहेर शिर्डी मार्गावर खरातच्या जमिनीवर प्रशस्त असे हार्डवेअरचे दुकान सुरू झाले. त्यांचा भाचा ते दुकान बघू लागला तर दुकानाच्या बाहेर पश्चिमेला बांधलेल्या छोट्याशा कार्यालयात अधून-मधून खरात थांबू लागला. त्याची बैठक तेथे सुरू झाल्यानंतर भक्तही तेथे येऊ लागले. काही दिवसांतच मंदिर बांधून पूर्ण झाले.

- Advertisement -

Ashok Kharat: खरातच्या करामतींनी सिन्नरकर हादरले! हिडीस रूप उघड झाल्यानंतरही त्याच्या लीलांवर बसेना विश्वास..

दरबारात खरातची वाट पाहणाऱ्यांमध्ये मोठी मंडळी
मंदिराचा उद्‌घाटन सोहळा दिमाखात पार पडला. मंदिरात दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आणि प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर बाजूला ट्रस्टचे दोन मजली कार्यालय उभे केले. प्रत्येक रविवारी खरातचा दरबार तेथे भरत असे. त्यात राजकारणी, व्यावसायिक, आयपीएस आणि आयएएस अधिकारी मोठ्या संख्येने येत असल्याचे सांगायचे. तास-तासभर खरातची वाट पाहणाऱ्यांमध्ये अनेक राजकीय मंडळी असत. त्यातून ट्रस्टकडे पैसा जमा होत. मंदिराच्या समोरच्या पाच एकर जागेवर वेधशाळा, गोशाळा, युवकांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी राजकारण्यांचा निधीही मिळत असे. शिर्डी रस्त्यावर प्रशस्त आणि आकर्षक असे प्रवेशद्वार व तेथून मंदिरापर्यंत डांबरी रस्ता करण्यात आला.

Rupali Thombare Patil: ‘रुपाली चाकणकर फरार…बजाव टाली’; रुपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टने खळबळ

मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकसह सभागृह बांधण्यात आले होते. श्रावणात भाविकांमध्ये स्पर्धा लागू लागायची. खरातचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी हजारो भाविकांचे महाप्रसादाचा खर्च देण्यासाठी आधीपासूनच नंबर असायचे. खरातचा वाढदिवस, गुरुपौर्णिमा यासारखे उत्सवही मंदिराच्या प्रांगणात होऊ होत असत.

नेमकं प्रकरण काय?
अशोक खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात याने एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार १८ मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कोण आहे अशोक खरात?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...