Wednesday, June 10, 2026
HomeनगरShirdi : अशोक खरातची रवानगी नाशिक कारागृहात

Shirdi : अशोक खरातची रवानगी नाशिक कारागृहात

शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. राहाता न्यायालयाने खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, न्यायालयाच्या या आदेशानंतर त्याची कडेकोट बंदोबस्तात नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

- Advertisement -

शनिवारी अशोक खरातची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तपास अधिकारी निवांत जाधव यांनी सरकारी पक्षातर्फे प्रबळ युक्तिवाद केला. या प्रकरणातील दुसरी संशयित कल्पना अशोक खरात हिला अद्याप अटक करणे बाकी असून, आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी करण्यासाठी आणि महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी आरोपीची अधिक पोलीस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच तपासादरम्यान आरोपीकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा दावाही पोलिसांनी केला.

दुसरीकडे, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी देण्याऐवजी खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने विचारणा केली असता खरातने आपली कोणतीही तक्रार नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले. न्यायालयीन आदेशानुसार आता पुढील काही दिवस खरातचा मुक्काम नाशिक कारागृहात असणार आहे. मात्र, हे प्रकरण इथेच थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिक एसआयटी कडून दुसर्‍या एका प्रकरणाच्या तपासासाठी अशोक खरातचा पुन्हा ताबा मागितला जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा तपास यंत्रणांच्या वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात या जमीन घोटाळ्याचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात, याकडे शिर्डी परिसराचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गितेंचे बंड थंड होणार? दराडे...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) भाजपचे माजी स्थायी सभापती गणेश गिते (Ganesh Gite)...