Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाASIA CUP 2023 : आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

ASIA CUP 2023 : आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

आशिया चषकात भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर 2023 रोजी पाकिस्तान विरोधात होणार आहे. हा सामना श्रीलंकेमधील कँडी येथील मैदानात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या सामन्याने आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाकिस्तानमधील मुल्तान मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघ वगळता इतर सर्व संघ पाकिस्तानमध्ये किमान एक सामना तरी खेळणार आहेत. 30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 यादरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे.

- Advertisement -

आशिया चषकाचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. यानुसार भारताचे दोन्ही सामने श्रीलंकेमध्ये कँडी मैदानावर होणार आहेत. आशिया चषकाचे एकूण 13 सामने होणार आहेत. यापैकी चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत, तर नऊ सामने श्रीलंकेमध्ये होणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आशिया कप 2023 चे वेळापत्रक

(फेरी नंबर -1)

30 ऑगस्ट पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान

31 ऑगस्ट बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, कँडी

2 सप्टेंबर भारत विरुद्ध पाकिस्तान, श्रीलंका, कँडी,

3 सप्टेंबर बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर,

4 सप्टेंबर भारत विरुद्ध नेपाळ, कँडी,

5 सप्टेंबर नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान

सुपर-4 (फेरी नंबर -2)

6 सप्टेंबर ए1 विरुद्ध बी2, लाहोर,

9 सप्टेंबर बी1 विरुद्ध बी2, कँडी,

10 सप्टेंबर ए1 विरुद्ध ए2, कँडी,

12 सप्टेंबर ए2 विरुद्ध बी1, डंबुला,

14 सप्टेंबर ए1 विरुद्ध बी1, डंबुला,

15 सप्टेंबर ए2 विरुद्ध बी2, डंबुला,

17 सप्टेंबर अंतिम सामना

- Advertisment -

ताज्या बातम्या